Petrol Price News : भारतात पेट्रोलची किंमत (Petrol Price) प्रति लिटर 94.72 ते 107.50 आहे. तर शेजारील देश भूतानमध्ये तेच पेट्रोल प्रति लिटर 58 ते 67 या दराने मिळते. लोक अनेकदा सोशल मीडियावर विचारतात की भारतातून पेट्रोल खरेदी करणारा भूतान देश इतके स्वस्त पेट्रोल कसे विकत आहे? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

Continues below advertisement

भारतात पेट्रोल महाग का आहे?

भारतात पेट्रोलची किंमत इतकी वाढली आहे कारण त्यात बरेच कर समाविष्ट आहेत. जेव्हा एखादा भारतीय ग्राहक पेट्रोल पंपावर प्रति लिटर 100 रुपये किमतीचे पेट्रोल खरेदी करतो तेव्हा त्याचा मोठा भाग केंद्र आणि राज्य सरकारांचा कर असतो. यामध्ये हे समाविष्ट आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्कराज्य व्हॅट (मूल्यवर्धित कर)डीलर कमिशन

Continues below advertisement

यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी भारतीय ग्राहकांना त्याचा थेट फायदा मिळत नाही. सरकारचे कर धोरण इतके जड आहे की पेट्रोलची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा अनेक पटीने जास्त होते.

भूतानमध्ये पेट्रोल स्वस्त का आहे?

भूतान सरकार भारतातून पेट्रोल खरेदी करते पण कमी कर किंवा सबसिडी लादून ते आपल्या नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध करुन देते. म्हणजेच, तेथील सरकार नागरिकांवर कराचा भार टाकत नाही. म्हणूनच भूतानमध्ये तेच पेट्रोल 58 रुपये ते 67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, जे भारतात सुमारे 100 रुपये आहे.

भूटानची  एकूण लोकसंख्या 8 लाख

भूतान हा एक छोटासा देश आहे ज्याची एकूण लोकसंख्या सुमारे 8 लाख आहे आणि तेथील पेट्रोलचा वापर खूप मर्यादित आहे. अशा परिस्थितीत, तेथे वितरण खर्च देखील कमी आहे आणि सबसिडीचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. याशिवाय, भूतान पेट्रोलवर कोणतेही मोठे उत्पादन शुल्क लादत नाही.

भारतापेक्षा या देशांमध्ये पेट्रोल स्वस्त 

भारतात पेट्रोलची सरासरी किंमत प्रति लिटर 101 रुपये आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये ते 80.4 रुपये आणि बांगलादेशमध्ये 85 रुपये प्रति लिटर आहे. इतर अनेक देशांमध्येही भारतापेक्षा कमी दर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी भारतीय ग्राहकांना त्याचा थेट फायदा मिळत नाही. नाही कारण सरकार विविध प्रकारचे कर आकारते, त्यामुळं दर वाढतात.

महत्वाच्या बातम्या:

दिलासादायक! पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर माहिती