Tea Exports Fall In First Seven Months of 2023: सततच्या वातावरणीय बदलांमुळे यावर्षी देशातील चहाची निर्यात (Tea Export) घसरली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत निर्यातीत 2.23 टक्के घसरण झाली आहे. 'टी बोर्ड' या संस्थेनं (Tea Board Organization) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आसाम (Assam) आणि पश्चिम बंगालमधून (West Bengal) 69.56 दशलक्ष किलो चहाची निर्यात करण्यात आली आहे. तर दक्षिण भारतातील उत्पादनातही घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील वर्षी पहिल्या सहा महिन्यात 117.21 किलो चहाची निर्यात करण्यात आली होती. तर यंदा घटलेल्या आकडेवारीनुसार, 114.60 दशलक्ष चहा निर्यात करण्यात आला आहे.

  


2023 च्या पहिल्या सात महिन्यांत भारतातून चहाची निर्यात 2.23 टक्के कमी झाली असून ती 114.60 दशलक्ष किलोग्रॅम एवढी झाली आहे. चहा बोर्ड संस्थेनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2023 च्या पहिल्या सात महिन्यांत (जानेवारी ते जुलै) भारतातून चहाची निर्यात 2.23 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 11 कोटी 46 लाख किलोग्रॅम झाली आहे. 2022 च्या याच कालावधीत चहाची निर्यात 11 कोटी 72.1 लाख किलोग्रॅम होती.


प्रामुख्याने आसाम आणि पश्चिम बंगाल राज्यांचा समावेश असलेल्या उत्तर भारतातील निर्यात यंदाच्या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत 69.56 दशलक्ष किलोग्राम होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 70.56 दशलक्ष किलोग्राम होती. 


2022 च्या पूर्वीच्या समान कालावधीत 270.85 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तुलनेत 2023 च्या पहिल्या सात महिन्यांत निर्यातीतून युनिट किंमत वसूली देखील 265 रुपये प्रति किलोग्रॅमवर घसरली.