TCS Q4 Result Update: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणजेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून गुंतवणूकदार आणि शेअऱ बाजारासाठी मोठी अपडेट देण्यात आली आहे. कंपनीनं जाहीर केल्यानुसार  टीसीएसच्या बोर्डाची बैठक 10 एप्रिल 2025 ला होणार आहे. त्यामध्ये जानेवारी- मार्च या चौथ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले जातील. यासह कंपनीकडून गुंतवणूकदारांना लाभांश देखील जाणार का हे पाहावं लागेल.   

अंतिम लाभांश मिळणार?

टीसीएसनं सेबीकडे केलेल्या फायलिंगनुसार स्टँडअलोन आणि कनसॉलिडेटेड या दोन्ही मार्गांनी ऑडिटेड वित्तीय निकाल मंजूर केला जाईल. जर सर्व काही चांगलं आणि सुरळीत राहलं तर शेअर धारकांना या आर्थिक वर्षातील अंतिम निकाल जाहीर करण्यासोबत अंतिम लाभांश दिला जाईल.  कंपनीनं या सोबत केलेल्या घोषणेनुसार कंपनीनं हे देखील जाहीर केलं आहे. ते ट्रेडिंग विंडो बंद करतली. म्हणजेच 24 मार्च  पासून निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांसाठी कंपनीच्या शेअरधारकांना डिझायनेटेड पर्सन्स कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करु शकत नाहीत. इनसायडर ट्रेडिंगपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

सायंकाळी पत्रकार परिषद

टीसीएसकडून सायंकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. निकालानंतर कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन सायंकाळी साडे पाचला पत्रकार परिषद घेतली.  त्यानंतर सात वाजता इन्वेस्टर्स आणि अनालिस्ट कॉल होईल. यामध्ये कंपनी  त्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील कमाईचा विचार करतील.  

विशेष बाब म्हणजे, टीसीएसनं प्रत्येक तिमाहीत दमदार कामगरी केली आहे.आता गुंदवणकूदारांचं लक्ष या गोष्टीकडे लागलं आहे. ते म्हणजे लाभांश होय. कित्येक गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार कंपनी मजबूत झाल्यानं आणि चांगला परतावा मिळेल, अशी आशा आहे.   

 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)