Sukanya Samriddhi Scheme : केंद्र सरकारनं जनतेला मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षाच्या आधी, सरकारनं सुकन्या समृद्धी योजना (SSY) जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीसाठी 3 वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजात किरकोळ वाढ करण्यात आली येणार असल्याचं एका अधिसूचनेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. तर अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.1 टक्के केला आहे, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा दर 7.1 टक्के केला आहे. यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज 8 टक्के आणि तीन वर्षांच्या टीडीचे व्याज 7.1 टक्के होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही.
पीपीएफचे व्याज झाले कमी
PPF व्याजातील शेवटचा बदल एप्रिल ते जून 2020 मध्ये झाला होता. जेव्हा तो 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला होता. गेल्या वेळी केंद्र सरकारनं पंचवार्षिक आरडी योजनेत कोणताही बदल केला नव्हता. आजच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर 4 टक्के ते 8.2 टक्के दरम्यान होते.
जानेवारी-मार्च 2024 चे व्याजर
पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के व्याजएक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर 6.9 टक्के2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के3 वर्षांच्या ठेवींवर 7.1 टक्के व्याजदर5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज आहे5 वर्षांच्या आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहेराष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्केकिसान विकास पत्र व्याज 7.5 टक्के सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के सुकन्या समृद्धी खात्यावर (SSY) व्याज 8.2 टक्के आहेज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSSY) व्याज 8.2 टक्के आहेमासिक उत्पन्न खाते व्याज 7.4 टक्के
महत्त्वाच्या बातम्या: