Sugar Prices News : वाढत्या साखरेच्या दरावर (Sugar Prices) नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध स्थरावर उपाययोजना करत आहे. साखरेचे दर (Sugar Price) अचानक वाढल्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. तरऐनसणासुदीच्याकाळातवाढत्यामहागाईमुळे (Sugar Price Hike) सर्वसामान्यांचेबजेट कोलमडेलंय. दरम्यान, वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोरआली आहे. ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांनी साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्या ठरवलेल्या मर्यादेपलीकडे साखरेचा पुरवठा करतायेणारनाहीये. झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टने विकल्या जाणाऱ्या साखरेच्या पाकिटांच्या संख्येवर मर्यादा (Limits Imposed on Sugar Purchase) घातली आहे. काही ब्रँड्सनी दोन किलोपेक्षा जास्त, तर इतरांनी तीन किलोची मर्यादा निश्चित केली आहे. परिणामीआता ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांनी साखर विक्रीवर मर्यादा निश्चित केल्याचीमाहितीआहे. (Sugar Prices News)

Continues below advertisement
Sugar Price Hike: एका वेळी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त साखर खरेदीवर मर्यादा

मिळालेल्यामाहितीनुसार, ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्वत्र वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. ब्रँडनुसार ही मर्यादा 2-3 किलोपर्यंत बदलतअसून साखर खरेदीवरही मर्यादा घालण्यातआलीआहे. झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगीनेही मर्यादा निश्चित केल्या आहेत. सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत आणि आता अनेक क्विक कॉमर्स ॲप्स आणि मोठी दुकाने एका वेळी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त विक्री करतायेणार नाहीये. परिणामी, लोकांनी एकाच वेळी जास्त साठा करू नये आणि इतर ग्राहकांनाही साखर उपलब्ध होईल याची खात्री करणे, हा यामागील उद्देश आल्याचंबोललंजात आहे.

दरम्यान, स्विगी, इन्स्टामार्टवर सारख्या प्रत्येक ब्रँडच्या साखरेच्या दोन पाकिटांची किंवा दोन किलोची ऑर्डर मर्यादित आहे, तर ब्लिंकइटवर काही पॅक दोन किलोपेक्षा जास्त घेण्यास परवानगी नाही. ब्लिंकइटवर, एका ब्रँडच्या फक्त एका 3 किलोच्या पॅकला परवानगी आहे आणि झेप्टोवर, एका ब्रँडच्या फक्त एका 2 किलोच्या पॅकला परवानगी आहे. ही मर्यादा सर्वत्र सारखी नाही. ती ॲप, प्रदेश, ब्रँड आणि स्टॉकनुसार बदलत असल्याचीमाहितीआहे. झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टने काही साखर उत्पादनांच्या पॅकच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. तर दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये, बिगबास्केट काही ब्रँड्सच्या सहा पाकिटांपर्यंत परवानगी देत ​​आहे, याचा अर्थ हा देशव्यापी सरकारी निर्बंध नसल्याचेपुढेआलंआहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या