Success Story : आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांनी यश मिळतेच. मोठ्या यशासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अंकुश सचदेवा (Ankush Sachdeva) या तररुणाची यशोगाथा. अंकुशने आयआयटीमधून (IIT) पदवी घेतल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली. पण, त्याला नोकरीत रस नसल्यामुळं त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी एकामागून एक 17 कल्पनांवर काम केले. मात्र, या सर्व 17 स्टार्टअपवर तो अपयशी ठरला. अखेर अंकुश 18 व्या वेळेस यश मिळालं. आज अंकुश  40 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे. 


अंकुश सचदेवाने आपले काम सुरू करण्यासाठी वेगवेगळी स्टार्टअप सुरु केले. पण त्यामध्ये 17 वेळा अपयश आलं. पण अंकुशने कधी हार मानली नाही. अखेर 18व्यांदा त्याने आपल्या दोन मित्रांसह असा पराक्रम केला की आज हजारो कोटींची कंपनी स्थापन झाली. त्यांचा व्यवसाय अमेरिका आणि युरोपसह जगातील सर्व देशांमध्ये पसरला आहे आणि त्यांचे लाखो वापरकर्ते आहेत.


कसा साधला पराक्रम?


18व्या प्रयत्नात सचदेवाने त्याच्या दोन आयआयटी मित्रांची मदत घेतली. फरीद अहसान आणि भानू सिंग यांच्यासोबत त्यांनी शेअरचॅट अॅप तयार केले. या तिघांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर काही युजर्स शोधले ज्यांना काहीतरी नवीन करून बघायचे होते. यानंतर, जानेवारी 2015 मध्ये, शेअरचॅटची मूळ कंपनी मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली. यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये शेअरचॅट लाँच करण्यात आली. सुरुवातीला हे हिंदी, मराठी, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये लॉन्च करण्यात आले होते.


ShareChat ने आपल्या व्यवसाय अमेरिका युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये


ShareChat चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. परंतू, या कंपनीने आपला व्यवसाय अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये पसरवला आहे. आज या अॅपचे करोडो वापरकर्ते आहेत. कंपनीने जवळपास 1000 लोकांना थेट नोकऱ्याही दिल्या आहेत. शेअरचॅटला जून 2022 मध्ये निधी मिळाला होता. जेव्हा कंपनीचे मूल्य 5 अब्ज  डॉलर (40 हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता.


IIT कानपूरमधून शिक्षण


अंकुश सचदेवाने 2015 मध्ये IIT कानपूरमधून पदवी प्राप्त केली. याआधी तिने सोमरविले स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केली होती. अंकुशने मे ते जुलै 2014 या कालावधीत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केले. अंकुश सध्या शेअरचॅटमध्ये सीईओ म्हणून काम करत आहे. कंपनीचे मूल्यांकनही आता 50 हजार कोटींच्या पुढे गेले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


परदेशातील दीड लाखांची नोकरी सोडली, आज तरुण महिन्याला कमावतोय 3 लाख; सुरु केला 'हा' व्यवसाय