Share Market : सेन्सेक्सच्या टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचं नुकसान, 78166 कोटी रुपयांचा तोटा, रिलायन्सला सर्वात मोठा फटका, पाच दिवसात काय घडल?
Share Market: शेअर बाजारात तेजी आणि घसरणीचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचं बाजामूल्य घटलंय. 78166.08 कोटी रुपयांची घसरण झाल्याचं समोर आलं आहे.

Share Market:भारतीय शेअर बाजारात तेजी आणि घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळालं. 19 मे ते 23 मे दरम्यान सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. यामध्ये सर्वाधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. शेअर बाजारातील कमजोर संकेतामुळं बीएसई सेन्सेक्स 609.51 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 50 मध्ये 166.65 अंकांची घसरण झाली.
रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान
या पाच दिवसांच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज, टिसीएस, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, हिंदूस्तान यूनिलिव्हर या कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. त्याचवेळी एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, आयटीसीच्या बाजारमूल्यात वाढ झाली. रिलायन्सचं बाजारमूल्य 40,800.4 कोटींनी घसरुन 19,30,339.56 कोटी रुपयांवर आलं. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचं बाजारमूल्य 7,710.54 कोटींनी घसरुन 12,71,395.95 कोटी रुपये झालं आहे.
या कंपन्यांना देखील नुकसान झालं
इन्फोसिसचं बाजारमूल्य देखील घटलं आहे. इन्फोसिसचं बाजारमूल्य 10488.58 कोटी रुपयांनी घसरुन 649876.91 कोटी रुपयांवर आलं आहे. हिंदूस्तान यूनिलीव्हरचं बाजारमूल्य 5462.8 कोटींनी घसरुन 5,53,974.88 कोटी रुपयांवर आलं आहे. आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 2,454.31 कोटी रुपयांनी घसरुन 10,33,868.01 कोटी रुपये झालं आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 1249.45 कोटी रुपयांनी 705446.59 कोटी रुपये झाली आहे. दुसरीकडे भारती एअरटेलचं मार्केटमूल्य 10,121.24 कोटी रुपयांनी वाढून 10,44,682.72 कोटी झालं आहे. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 4,548.87 कोटी रुपयांनी घसरुन 5,74,207.54 कोटी रुपयांवर आलं.
'या' कंपन्यांना झाला फायदा
आयटीसीचं बाजारमूल्य 875.99 कोटी रुपयांनी वाढून 545991.05 कोटी रुपयांवर आलं. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 399.93 कोटी रुपयांनी वाढून 14,80,723.47 कोटी रुपये झालं. सर्वाधिक घसरण होऊन देखील बाजारमूल्याच्या निकषावर रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात मोठी कंपनी राहिली. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान यूनिलीव्हर आणि आयटीसी असा क्रम आहे. येणाऱ्या आठवड्यात शेअर बाजारात कसा राहणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या






















