Share Market Muhurat Trading: आज देशभरात दिवाळीचा (Diwali Celebration) उत्साह दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार बंद असले तरी सायंकाळी एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग होणार (Share Market Muhurat Trading) आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आज होणारी ट्रेडिंग ही शुभ समजली जाते. 


लक्ष्मी पूजनानंतर एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग होते. या एक तासात गुंतवणूकदार शेअर बाजारात ट्रेडिंग करतात. तर, काही गुंतवणूकदारांकडून दीर्घ मुदतीसाठी शेअर खरेदी केले जातात. या दिवशी खरेदी केलेले शेअर्स अनेकजण दीर्घकालीन मुदतीसाठी खरेदी करणे शुभ असल्याचे मानतात.


शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा जवळपास 50 वर्ष जुनी आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिनी केलेली गुंतवणूक लाभदायक समजली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा खरेदीकडे अधिक असतो. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर बाजारात 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, या दिवशी होणारी गुंतवणूक फार कमी आणि प्रतिकात्मक स्वरुपात असते.


दिवाळीनिमित्त होणाऱ्या एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे.  मुहूर्त ट्रेडिंग सुरू करण्याआधी शेअर बाजारात गणेश-लक्ष्मी पूजन होते. त्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात होते. आज होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 


>> मुहूर्त ट्रेडिंगचे शेड्यूल


> ब्लॉक डिल सेशन- सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत
> प्री-ओपनिंग सेशन- सायंकाळी 6 ते 6.08 वाजेपर्यंत
> नॉर्मल मार्केट - सायंकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत
> कॉल ऑक्शन सेशन - सायंकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत
> क्लोजिंग सेशन- सायंकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत 


वर्ष 2021 मध्ये कसे होते मुहूर्त ट्रेडिंग


मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 मध्ये  मुहूर्त ट्रेडिंग झाली होती. या विशेष एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. तर, निफ्टी 17,921 अंकांवर स्थिरावला होता. यंदाच्या वर्षात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे. मात्र, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजी दिसून येईल असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: