Stock Market Opening : शेअर बाजारात आज मोठी उसळी (Share Market) पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स निफ्टीच्या वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहे. निफ्टीनं आज 1 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह व्यवहार सुरू केला आहे. BSE सेन्सेक्स 503.16 अंकांच्या म्हणजेच, 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 59,320.45 वर उघडला. याशिवाय, NSE च्या निफ्टीनं 176.90 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,711.65 वर व्यापार सुरू केला आहे.
निफ्टीची परिस्थिती काय?
सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये निफ्टी 17700 च्या खाली आला. दरम्यान, सध्या 50 पैकी 46 शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर उर्वरित 3 शेअर्स घसरले आहेत. तर एका शेअरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, जर बँक निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर, तो 411.10 अंकांच्या वाढीसह 1.07 टक्क्यांच्या तेजीसह 38,698 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
सेक्टोरियल इंडेक्समध्ये काय परिस्थिती?
निफ्टीच्या सर्व सेक्टोरियल इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सर्वाधिक 1.93 टक्यांची उसळी आयटी शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे. तर 1.15 टक्के रिअॅलिटी शेअर्सच्या किमतींतही वाढ झाली आहे. तर बँक-पीएसयू बँक 1.14 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. ऑईल आणि गॅसचे शेअर्स आणि ऑटो-फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्येही वाढ झाली आहे.
आजचे कोणते शेअर्स वाढले?
निफ्टीमध्ये आज ज्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा 2.82 टक्क्यांनी वर आहे. इंडसइंड बँक 2.50 टक्क्यांनी वर आहे. विप्रोनं 2.23 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. ICICI बँक 1.94 टक्क्यांच्या मजबूतीसह व्यवहार करत आहे आणि TCS मध्ये 1.84 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे.
आज कोसळलेल्या शेअर्सची स्थिती
टाटा कंज्यमूरचे शेअर्स सुमारे 1.9 टक्क्यांनी घसरले आहेत. हिंडाल्कोमध्ये 0.28 टक्क्यांनी आणि टाटा स्टीलमध्ये 0.14 टक्क्यांची पडझट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एनटीपीसी कोसळला आहे.
प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची परिस्थिती काय?
आज प्री-ओपनिंगमध्येही बाजाराची सुरुवात चांगली झाली होती. SGX Nifty मध्ये 195.50 अंक म्हणजेच, 1.11 टक्क्यांनी 17750 च्या पातळीवर झेप घेतली. BSE सेन्सेक्स 206.81 अंकांच्या वाढीसह 59024 वर उघडला. NSE चा निफ्टी 90.25 अंकांनी वाढून 17623.10 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :