Share Market Opning Bell : सलग मागील 6 सत्रातील पडझडीनंतर आज भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) सावरला. सेन्सेक्स (Sensex) 413 हून अधिक अंकांनी तर निफ्टी (Nifty) 115 अंकांनी वधारला आहे. तसेच, काल ऐतिहासिक घसरणल झालेला निफ्टी बॅंक निर्देशांक देखील आज वधारल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारी बॅंकांच्या तिमाहीचे आकडे चांगले आल्यानं पीएसयू बॅंकांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तसेच, अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट, महिंद्रा ॲंड महिंद्रा, टाटा स्टीलसारखे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. अमेरीकन बाजारात पडझड झाली असली तरी आशियाई बाजारात सकाळच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे.
आज सकाळी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात उघडले. BSE सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 63,400 च्या वर व्यवहार करत आहे. निफ्टीनेही 70 अंकांची वाढ करत 18,900 चा टप्पा पार केला आहे. बँकिंग आणि मेटल क्षेत्रात वाढ दिसत आहे. याशिवाय बजाज ऑटो, इन्फोसिस, हिंदाल्को शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. काल BSE सेन्सेक्स 901 अंकांनी घसरून 63,148 वर बंद झाला. त्यातुलनेत आज सकाळी सुरुवातीपासूनच शेअर बाजारात वाढ दिसत आहे.
गेल्या 6 दिवसांत बाजारात मोठी पडझड
भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळतेय, गेल्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी रुपये बुडालेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असून, इस्रायल आणि हमास युद्धाचीही झळ भारतीय शेअर बाजाराला बसत असल्याचं दिसून आलंय. तर या युद्धाची तीव्रता आणखी वाढल्यास काही दिवस बाजारात अशीच घसरण सुरु राहिल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कालचा दिवस काळा गुरूवार ठरला. भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कमालीचे कोसळले. गेल्या सात महिन्यातली ही सर्वात मोठी घसरण ठरली. सेन्सेक्स 901 अशांनी कोसळलत 63 हजार 148 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 265 अंकांनी घसरत 18 हजार 857 अंकांवर बंद झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :