Stock Market Opening : देशांतर्गत शेअर बाजाराची (Share Market) परिस्थिती आज काहीशी स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर आज बँक शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


अशी झाली सुरुवात 


आजच्या शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 174.36 अंकांच्या म्हणजेच, 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 59,136.48 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 56.15 अंकांच्या म्हणजेच, 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 17,360.10 च्या पातळीवर उघडला. 


सेन्सेक्स आणि निफ्टीची परिस्थिती काय? 


आज सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि फक्त एक शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. या शेअरचे नाव पॉवरग्रिड आहे. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स तेजीत आहेत आणि 11 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.


कोणत्या शेअर्स तेजीत? 


आज सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, एम अँड एम, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, एसबीआय, एल अँड टी, टाटा मोटर्स, मारुती, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंडस बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन, आयटीसी, एशियन पेंट्स, कोटक बँक, एचयूएल, एचडीएफसी, इन्फोसिस आणि भारती एअरटेलचे शेअर्स आज तेजीसह व्यवहार करत आहेत.


कोणत्या शेअर्समध्ये पडझड? 


आज, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स तेजीत आहेत. तर केवळ 2 शेअर्समध्ये पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. एनटीपीसी आणि पॉवरग्रीड या शेअर्समध्ये पडझड झाली आहे.