नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 9 एप्रिलला पतधोरण जाहीर करत रेपो रेटमध्ये कपात केल्याची घोषणा करण्यात आली.आरबीआयनं रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली यामुळं रेपो रेट 6.00 टक्क्यांवर आला. यानंतर विविध बँकांकडून गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याज दरात कपात करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळं गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर कमी होणार आहेत. यामुळं दरमहा ईएमआयची रक्कम देखील कमी होईल. 

आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक 7 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करत असल्याची घोषणा केली. यामुळं रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.00 टक्क्यांव आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर विविध बँकांकडून देखील व्याजदरात कपात करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. 15 एप्रिल 2025 म्हणजे आजपासूनच दरामधील कपात लागू करण्यात आली आहे. बँकेच्या EBLR चा दर 8.90 टक्क्यांवरुन 8.65 टक्क्यांवर आली आहे. एसबीआयनं त्यांच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये दुरुस्ती करुन ते 8.50 ते 8.25 टक्के केलं आहे.    

कर्जाचा मासिक हप्ता कमी होणार

आरबीआयनं पतधोरण बैठकीनंतर रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करत असल्याचं जाहीर केलं. रेपो रेटमधील कपातीची घोषणा 9 एप्रिल 2025 करण्यात आली. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.00 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. रेपो रेटमधील कपातीचा फायदा फ्लोटिंग व्याज दर पर्याय ज्या कर्जदारांनी निवडला आहे त्यांना होणार आहे. त्यांच्या ईएमआयचा दर कमी होईल. मात्र, त्याचवेळी जेव्हा रेपो रेट वाढेल तेव्हा व्याजदर देखील वाढणार आहे. 

रेपो रेटमध्ये  जेव्हा कोणताही बदल होत नाही तेव्हा कर्ज घेणाऱ्यांच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होत नाही. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर बँकांकडून व्याज दरात कपात केली जाते. 

 बँक ऑफ महाराष्ट्रनं देखील त्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. बँकेनं व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केले आहेत. यामुळं गृहकर्जावरील व्याज 0.25 टक्क्यांनी कमी झालं आहे.

इतर बातम्या : 

Investment: बँकांमधील सेव्हिंग अकाऊंटचा व्याजदरात घट, ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय, व्याजही जास्त मिळेल!