Silver Price : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूती आणि कमकुवत होत चाललेले अमेरिकन डॉलर यामुळे मंगळवारी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये चांदीच्या किमती 10 हजार 442 ने वाढून 2 लाख 77 हजार रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील लष्करी कारवाई लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत दिले. ट्रम्प यांच्या विधानानंतर, चांदी आणि सोन्याला तेजी मिळाली

Continues below advertisement

चांदीसोबतच सोन्याच्या किमतीतही वाढ झाली. सोन्याच्या किमती सुमारे 2000 ने वाढल्या आणि ते सुमारे  1 लाख 62 हजार रुपयांवर व्यवहार करत होते. आतापर्यंत सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 61 हजार 452  चा नीचांकी आणि प्रति 10 ग्रॅम 1 लाख 62 हजार 149 चा उच्चांक गाठला आहे.

परदेशी बाजारात वाढ

बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भावना सुधारल्यामुळे मागील सत्रात चांदीच्या किमती घसरल्यानंतर वाढल्या आहेत. 

Continues below advertisement

चांदीला पुन्हा तेजी मिळाली

सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील लष्करी कारवाई लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत दिले. ट्रम्प यांच्या विधानानंतर, चांदी आणि सोन्याला तेजी मिळाली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार आता ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि वैयक्तिक वापर खर्च (PCE) किंमत निर्देशांकासह आगामी अमेरिकन चलनवाढ निर्देशकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, जे चलनवाढीच्या ट्रेंड आणि संभाव्य चलनविषयक धोरणाच्या दिशेने पुढील संकेत देतील. येत्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्या चांदीच्या दरात इतके चढ उतार कशाने? 

- जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घसरल्यानंतर, देशांतर्गत सोन्या-चांदीच्या बाजारात दबाव दिसत आहे. अमेरिकन फेडरल रिजर्वच्या FOMC च्या मिनिटांनी आगामी चलन विषयक धोरणांमध्ये अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिल्यानंतर हा दबाव आणखी ठळकपणे दिसून येत आहे. या आठवड्यात जाहीर होणाऱ्या प्रमुख जीडीपी आणि पीसीई डेटावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. 

-दरम्यान युएस फेड रिझर्वने व्याजदर कपातीची आशा कमी केल्यामुळे देशांतर्गत सोन्याचा दर घसरला. अमेरिकन फेडच्या शेवटच्या धोरण बैठकीच्या मिनिटांमध्ये धोरणकर्त्यांमध्ये व्याजदरावरील पुढचे पाऊल काय असेल. त्यामुळे डॉलर मजबूत झाला. आणि सोन्याचा  दर घसरला.  

-अमेरिकन फेडच्या जानेवारीतील बैठकीत अधिकाऱ्यांमध्ये पुढील दर कपातीवरून संमिश्र मते दिसली. काहींना महागाई कमी झाल्यास व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता सांगितली. तर काहींनी किमतींवर दबाव कायम राहिल्यास धोरण कडक करण्याची तयारी दर्शवलेली.