नवी दिल्ली: सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. बाजारात सलग चार दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ (Gold-Silver Price) नोंदवण्यात येत आहे. सराफा बाजारात काल (मंगळवारी, ता 25) सोन्यातील तेजीचा चौथा दिवस राहिला. या दिवशी सोने 2,700 रुपयांच्या वाढीसह 1,67,100 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहोचले, तर सोमवारी 99.9% शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,64,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.(Gold-Silver Price)
Gold-Silver Price : आजचे सोन्याचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि किरकोळ बाजारात आलेल्या किंचित नरमाईनंतर आज सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. Bullion.co.in नुसार, बुधवारी (26 ऑगस्ट 2026) सकाळी 6:30 वाजता सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे नोंदवले गेले, 24 कॅरेट सोने 1,63,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोने 1,49,811 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Gold-Silver Price)
गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 3.18% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज सर्वाधिक दर चेन्नईमध्ये पाहायला मिळत असून तिथे 24 कॅरेट सोने 1,63,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 1,49,976 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, दिल्लीत इतर शहरांच्या तुलनेत भाव थोडे कमी असून तिथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,850 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,279 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.(Gold-Silver Price)
Gold-Silver Price : चांदीचे ताजे दर
अखिल भारतीय सराफा संघानुसार, मंगळवारी चांदीच्या किमतीत 3,500 रुपयांची घसरण होऊन ती 2,50,000 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली. आज बुधवारी 999 फाइन सिल्व्हरचा दर 2,45,540 रुपये प्रति किलोग्राम तर 925 स्टर्लिंग सिल्व्हरचा दर 2,27,125 रुपये प्रति किलोग्राम आहे. आठवड्याभरात 999 फाइन सिल्व्हरच्या दरात 3.24% वाढ झाली आहे.
Gold-Silver Price : प्रमुख शहरांतील चांदीचे दर (प्रति किलो)
दिल्ली: 2,44,670 रुपये
मुंबई: 2,45,090 रुपये
चेन्नई: 2,45,810 रुपये
बेंगळुरू: 2,45,290 रुपये
Gold-Silver : 24 कॅरेट सोन्याचे दागिने का बनवले जात नाहीत?
24 कॅरेट सोने (99.9% शुद्ध) हे अत्यंत मऊ आणि लवचिक असते. या सोन्यापासून बांगड्या, अंगठी किंवा चेन बनवल्यास त्यावर थोडाही दाब पडल्यास त्याचा आकार बिघडू शकतो किंवा त्यावर खरोखरच्या नखांमुळेही ओरखडे पडू शकतात. तसेच, यात हिरे किंवा इतर मौल्यवान रत्नांना घट्ट पकडून ठेवण्याची क्षमता नसते. त्यामुळे दागिन्यांच्या टिकाऊपणासाठी 24 कॅरेटचा वापर न करता त्यात इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
Gold-Silver : 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे पर्याय
18 कॅरेट सोने हे 22 कॅरेटपेक्षाही अधिक मजबूत असते. यामध्ये 75% शुद्ध सोने आणि 25% तांबे, चांदी, झिंक किंवा निकेल यांसारखे इतर धातू असतात. या 25% मिश्रणामुळे दागिन्यांना विविध आकर्षक रंग देणे शक्य होते; जसे की रोज गोल्ड (Rose Gold) तांब्याचे प्रमाण वाढवल्यास मिळते. व्हाइट गोल्ड (White Gold) पॅलेडियम किंवा निकेल मिसळल्यास मिळते. 18 कॅरेट सोने इतके मजबूत असते की ते हिरा, पाचू (Emerald) किंवा माणिक (Ruby) यांसारख्या मौल्यवान रत्नांना घट्ट पकडून ठेवू शकते. तर रोजच्या वापराच्या दागिन्यांसाठी 14 कॅरेट हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये सोन्याचे प्रमाण 58.3% असते. हे अत्यंत दणकट आणि टिकाऊ असल्याने यापासून बनवलेले दागिने न वाकता किंवा न दबता वर्षांनुवर्षे जसेच्या तसे राहतात.
