Share Market Updates : भारतीय शेअर बाजाराची आज चांगली सकारात्मक सुरुवात झाली. जागतिक पातळीवरील शेअर बाजारातून मिळत असलेल्या सकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आली. बुधवारी, घसरणीनंतर शेअर बाजार बंद होताना वधारला होता. आज सकाळी पुन्हा बाजार वधारला. 


आज शेअर बाजारात उसळण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 400 अंकानी वधारत  57,458 अंकावर सुरू झाला. तर, निफ्टीमध्ये जवळपास 100 अंकाच्या तेजीसह 17,200 अंकावर सुरू झाला. 


आज निफ्टीतील 50 पैकी 39 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 11 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीही वधारला असल्याचे दिसून आला आहे. बँक निफ्टी निर्देशांक 221 अंकानी वधारत 36,536 अंकावर व्यवहार करत आहे. बुधवारी बाजार सावरल्यानं अनेकांना दिलासा मिळाला होता. त्याआधी झालेल्या पाच सत्रातील घसरणीमुळे ८ लाख कोटींनी बाजारातील भांडवलात घट झाली होती. 


कोल इंडियाचा शेअर दर 4 टक्क्यांनी वधारला आहे. तर, रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर 1.91 टक्क्यांनी वधारला. एशियन पेंट्स 1.88 टक्के आणि टीसीएस 1.55 टक्क्यांनी वधारला आहे. सन फार्मामध्ये 1.4 टक्क्यांनी वधारला. बजाज ऑटोमध्ये 0.60 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, टाटा स्टीलमध्ये 0.59 टक्के आणि ओएनजीसीमध्ये 0.49 टक्क्यांची घसरण दिसून आली. टेक महिंद्रामध्ये 0.42 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 


प्री-ओपनिंगमध्ये बाजार


आज प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. बीएसईचा 30 स्टॉकचा समावेश असलेला सेन्सेक्स 421.10 अंकांनी वधारला होता. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 97.50 अंकांची तेजी दिसून आली. 


दरम्यान, पाच सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला बुधवारी लगाम लागला. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 574 अंकांनी वधारला तर निफ्टीही 177 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.02 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,037 वर पोहोचला. तर, निफ्टीमध्ये 1.05 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,136 वर पोहोचला. 


बुधवारी 1716 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1593 शेअर्समध्ये घसरण झाली. 111कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.