Share Market Updates : जागतिक पातळीवर संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजाराची (Share Market) तेजीसह सुरुवात झाली. मात्र, बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली. ऑईल अॅण्ड गॅस, बँक आणि मेट्लस या सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आल्याने बाजारातील तेजीला लगाम लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 311  अंकांच्या घसरणीसह 60,691.54 अंकावर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 99.60 अंकांच्या घसरणीसह 17,844.60 अंकावर स्थिरावला. 

डॉलरच्या तुलनेत रुपया आज 10 पैशांनी मजबूत झाला. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 82.73 वर स्थिरावला. 

आज बँक आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील बँकांच्या शेअर दरात घसरण दिसून आल्याने बाजारातील तेजीला ब्रेक लागला. ऑटो आणि आयटी सेक्टरमधील स्टॉकने काही प्रमाणात घसरण थांबवली. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर,  12 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहारात टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एअरटेल या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, मारूती, एचडीएफसी, कोटक बँक, एसबीआय, रिलायन्स, टायटन, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 पैकी 20 कंपन्यांचे शेअर तेजीत बंद झाले. तर, 30 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 

आज दिवसभरातील व्यवहारात अल्ट्राटेक सिमेंट 1.75 टक्के, टेक महिंद्रा 1.35 टक्के, पॉवरग्रीड 0.91 टक्के, टाटा मोटर्स 0.67 टक्के, इन्फोसिस 0.62 टक्के, एचसीएल टेक 0.47 टक्के, महिंद्रा 0.47 टक्के तेजीसह बंद झाले.  सुझुकी 1.33 टक्के, एचडीएफसी 1.33 टक्के, कोटक महिंद्रा 1.26 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.18 टक्क्यांनी, एसबीआय 1.09 टक्क्यांनी घसरले.

BSE Sensex 60,710.33 61,290.19 60,607.02 -0.48%
BSE SmallCap 27,992.42 28,163.72 27,924.66 -0.19%
India VIX 13.38 13.71 10.92 2.27%
NIFTY Midcap 100 30,666.90 30,826.40 30,491.60 0.00
NIFTY Smallcap 100 9,385.20 9,455.75 9,356.45 -0.34%
NIfty smallcap 50 4,241.00 4,277.05 4,228.30 -0.48%
Nifty 100 17,626.90 17,768.75 17,600.85 -0.53%
Nifty 200 9,233.55 9,299.80 9,221.00 -0.45%
Nifty 50 17,844.60 18,004.35 17,818.40 -0.56%

गुंतवणूकदारांना फटका 

आज शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल  265.91 लाख कोटी रुपयांवर आले. शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी हे बाजार भांडवल 266.90 लाख कोटी रुपये होते. आज, सोमवारच्या सत्रात गुंतवणूकदारांचे सुमारे 99,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.