मुंबई : शेअर बाजारात घसरण सुरु असताना वामा इंडस्ट्रीजच्या एका छोट्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. वामा इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या 5 दिवसात 40 टक्क्याची वाढ पाहायला मिळाली आहे. आज वामा इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 16 टक्के वाढ झाली. कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी देखील तेजी पाहायला मिळाली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024  दरम्यान कंपनीच्या नफ्यात 4050 टक्क्यांनी वाढ  झाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 5 दिवसात 40 टक्क्यांची तेजी आली आहे.

कंपनीच्या नफ्यात 4050 टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत वामा इंडस्ट्रीजच्या नफ्यात 4050 टक्के वाढ झाली आहे. कंपनीला 83 लाखांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा केवळ 2 लाख रुपये होता.  कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत नफा 8 लाख रुपये होता. वामा इंडस्ट्रीज च्या उत्पन्नात 2833 वाढ होऊन 55.42 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षांपूर्वी कंपनीचं उत्पन्न 1.89 कोटी रुपये होतं. तिमाहीच्या आधारावर कंपनीचा महसूल  1627 टक्क्यांनी वाढला आहे. 

पाच दिवसांमध्ये शेअरमध्ये 40 टक्क्यांनी वाढ

वामा इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये रॉकेटप्रमाणं तेजी आली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. वामा इंडस्ट्रीजचा शेअर 5 फेब्रुवारीला 8.03 रुपये होता. 11 फेब्रुवारी म्हणजेच शेअर सध्या 11.29 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर गेल्या वर्षी 12 फेब्रुवारी 2024 ला 6.08 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 11 फेब्रुवारी 2025 ला 11.29 रुपयांवर आहे. 52 आठवड्यांमध्ये या कंपनीचा शेअर 11.82 रुपयांवर पोहोचला होता. तर, 52 आठवड्यामध्ये निचांकी पातळीवर4.40 रुपयांवर होता. 

शेअर बाजारात घसरण सुरुच

भारतीय शेअर बाजारावर डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ लादण्याचे निर्णय, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून होत असलेली समभागांची विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे याचा परिणाम झाला आहे. भारतीय शेअर बाजारात सोमवारी गुंतवणूकदारांना 7 .68 लाख रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागला. आज देखील शेअर बाजारात घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. 

इतर बातम्या:

ITR भरणाऱ्यांची संख्या 8 कोटींवर, करदात्यांची संख्या 70 लाखांनी घटली पण सरकारची कमाई वाढली

SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा 'तो' निर्णय ठरेल चुकीचा...

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)