मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग तीन दिवस घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये बुधवारी देखील घसरण झाली. कंपन्यांचे करार, बोर्ड मीटिंग, लाभांश, प्रोडक्शन अपडेट आणि नियामकासंदर्भातील अपडेटस मुळं काही शेअरमध्ये घडामोडी दिसून येऊ शकतात. आयटी, मेटल, फार्मा, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन एनर्जी आणि सार्वजनिक क्षेत्रातील स्टॉकमध्ये घडामोडी पाहायला मिळू शकतात. 

Share Market Update : कोणत्या स्टॉकमध्ये घडामोडींची शक्यता

इन्फोसिसच्या शेअरमध्ये घडामोडी पाहायला मिळू शकतात. इन्फोसिस आणि Cognition यांच्यात धोरणात्मक करार केला आहे. यानुसार Cognition चे एआय सॉफ्टवेअर एजेंट Devin ला ग्लोबल एंटरप्रायइज क्लाईंट म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरलं जाईल. 

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची उपकंपनी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फाईव्ह बी लिमिटेडनं एक करार केला आहे. 20.08 मेगावॅट  सोलर- विंड हायब्रिड पॉवर सप्लायसाठी वीज वाप करार आणि ट्राइपरटाईट करार केला आहे. 

सिप्ला लिमिटेडनं यूएस एफडीए कडून फारमातेन इंटरनॅशनल एसएच्या निरीक्षणासंदर्भातील वक्तव्यांसदर्भातील मिडिया रिपोर्टसवर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीनं सांगितलं की स्टॉक एक्सचेंजनं फॉर्म 483  शी संबंधित बातम्यांबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं.  

एएलसी इंडिया यांच्या संचालक मंडळाची बैठक 12 जानेवारी 2026 ला होणार आहे. यामध्ये  2025-26 साठी अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. 

हुडको या सरकारी हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं सांगितलं की छत्तीसगड सरकारसोबत एक करार केला आहे. त्यानुसार राज्यात घर आणि पायाभूत प्रकल्पांसाठी पाच वर्षासाठी 1 लाख कोटींचं फंडिंग केलं आहे. 

टाटा स्टीलनं तिसऱ्या तिमाहीत प्रोविजनल प्रोडक्शन आणि डिलिवरी डेटा जारी केला आहे. भारतात कंपनीचं क्रूड स्टील प्रोडक्शन 6.34 राहिल्याचं सांगितलं.

बजाज होल्डिंग्ज अँड इन्वेस्टमेंटनं सांगितलं की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 4 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. त्यात 31 डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांना मंजुरी दिली आहे. 

मीशो  कंपनी दिलेल्या माहितीनुसार जनरल मॅनेजर बिझनेस आणि सिनिअर मॅनेजमेंट ऑफिसर मेघा अग्रवाल यांनी  7 जानेवारी  2026 ला राजीनामा दिल्याचं जाहीर केला. 

Midwest Limited  या कंपनीला आंध्र प्रदेश सरकारच्या मॉइन्स अँड जिओलॉजी विभागाकडून क्वारी लीज वर्क ऑर्डर मिलाली आहे. या वर्क ऑर्डरनुसार कंपनी रंगीत क्वार्टजाइट ब्लॉक्सची क्वारींग करेल. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)