एक्स्प्लोर

Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला. 

Share Market Today मुंबई : भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी दिसून आली. सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला तर निफ्टी 50 नं  25650 अंकांचा टप्पा गाठला. संमिश्र जागितक संकेतांमुळं बाजाराची सुरुवात कमजोर झाली होती. दुसरीकडे  निफ्टी 50 देखील 25400 च्या खाली आला होता. मात्र, पहिल्याच तासात शेअर बाजारात खरेदीचा ट्रेंड सुरु झाला आणि बाजारात सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. 

भारतीय शेअर बाजारात ऊर्जा, रिअल्टी आणि फायनान्शिअल शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. या बळावर निफ्टी 25700 अकांच्या पार पोहोचला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 650.39 अंकांनी वाढून 83277.15  वर बंद झाला. निफ्टी 50 देखील 211.65 अंकांच्या तेजीसह  25682.75 वर बंद झाला आहे.

Share Market Update : गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई

पीएसयू बँक, रिअल्टी, प्रायव्हेट बँक, इन्फ्रा, कॅपिटल गुडस आणि ऊर्जा  या सेक्टोरल निर्देशांकात 1 ते 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. मीडिया आणि ऑटो निर्देशांकात 0.5 ते 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिशाली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला. तर, स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाला. लार्ज कॅप शेअरची कामगिरी या दोन्हीच्या तुलनेत चांगली राहिली.

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य  465.46 लाख कोटींवरुन 468.47 लाख कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच आज बीएसईवरील लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 3.01 लाख कोटींनी वाढलं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीमुळं नुकसान सहन करावं लागलेल्या गुंतवणूदारांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. 
 
बीएसई सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या टॉप 30 पैकी 20 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. यात पॉवर ग्रीडच्या स्टॉकमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.तर, सर्वाधिक घसरण टेक महिंद्राच्या शेअरमध्ये झाली. क्वालिटी वॉल्स, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, ट्रेंटच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

बीएसईवर आज एकूण 4496 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1793 शेअर तेजीसह बंद झाले. तर 2510 शेअरमध्ये घसरण दिसून आली. 193 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. 106 स्टॉकनं  52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि 211 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget