एक्स्प्लोर

Share Market : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला, एका तासात 4 लाख कोटी बुडाले

Share Market: भारतीय शेअर बाजार दोन दिवसांच्या तेजीनंतर तिसऱ्या दिवशी कोसळला आहे. यामुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

मुंबई: भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आण निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. सर्वच क्षेत्रात काही गुंतवणूकदारांना नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यानं शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला तर निफ्टी 50 निर्देशांक 25500 च्या खाली  आला होता. सेन्सेक्स 800 अंकांच्या घसरणीनंतर 82481 पर्यंत खाली आला होता. सर्वच क्षेत्रात विक्रीचं सत्र पाहायला मिळालं. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरले. 

Share Market : चार लाख कोटी गमावले

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात झालेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 469 लाख कोटींवरुन 465 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच अवघ्या तासाभरात गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले.

शेअर बाजारातील घसरणीची कारणं

शेअर बाजारातील घसरणीच्या कारणांचा विचार केला असता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय रद्द केल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा टॅरिफ लावले आहेत. व्यापार विस्तार कायदा 1962 च्या कलम  232 चा वापर करुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णय बाजूला ठेवण्याच्या दिशेनं ट्रम्प प्रशासन पाऊल टाकणार आहे.  अमेरिकन सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेताना अधिकाराचा मर्यादेबाहेर जाऊन वापर केल्याचं म्हटलं होतं. टॅरिफ लागू करण्याचे अधिकार अमेरिकन काँग्रेसचे असून ट्रम्प यांनी स्वत: त्याबाबत निर्णय घेतले, असं म्हणत अमेरिकन सुप्रीम कोर्टानं टॅरिफ बेकायदेशीर ठरवलं होतं. यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी 15 टक्के टॅरिफ लादलं आहे. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. इराणमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात सर्वत्र आंदोलन पसरत असल्यानं गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्या आहेत.  

आयटी स्टॉक्समधील घसरण हा देखील प्रमुख मुद्दा आहे. निफ्टी आयटी निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरला. तर, फेब्रुवारी महिन्यात निफ्टी आयटी 20 ट्क्यांनी घसरला आहे.  

ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 1 टक्क्यांनी वाढला आहे. एका बॅरलसाठी 72 अमेरिकन डॉलर मोजावे लागत आहेत.ब्रेंट क्रूड ऑईलनं सहा महिन्यांचा उच्चांक गाठल्यानं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Gold Silver Price Today:  सोने- चांदीच्या दरवाढीला ब्रेक, चांदीच्या दरात दोन दिवसात दोन हजार रुपयांची घसरण; सोन्याच्या भावातही घसरण, जाणून घ्या नवे दर 
सोने- चांदीच्या दरवाढीला ब्रेक, चांदीच्या दरात दोन दिवसात दोन हजार रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

Embed widget