Stock Market मुंबई : भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये जोरदार तेजी दिसून आली. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर शेअर बाजारानं पुन्हा तेजी पाहायला मिळाली. आज बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी 50 निर्देशांक 402.90 अंकांच्या तेजीसह 23840.10 अंकांवर बंद झाला. तर 1508.91 अंकांच्या तेजीसह 78553.20 अंकांवर बंद झाला. .

Continues below advertisement

मजबूत ग्लोबल संकेतांमुळं आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळं शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी पाहायला मिळाली. बँकिंग, वित्तीय सेवा आणि टेलिकॉम कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजीला सुरुवात झाली. भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ग्रासिम, सन फार्मा आणि झोमॅटोच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.  

शेअर बाजारातील तेजीची पाच प्रमुख कारणं -

रुपयाची मजबुती : सलग चौथ्या दिवशी रुपया मजबूत झाला. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारुन 85.54 रुपयांवर पोहोचला होता. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि जागतिक स्तरावर डॉलर कमजोर झाल्यानं रुपया मजबूत झाला. बुधवारी भारतीय रुपया 16 पैशांनी मजबूत झाला होता. 

Continues below advertisement

मजबूत ग्लोबल संकेत : आशियाई तेजी दिसून आल्यानं त्याचा देखील परिणाम शेअर बाजारावर झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी 1 टक्क्यांनी, जपानचा निक्केई 1.32 टक्के, हाँगकाँगचा हँगसँग 1 टक्क्यांनी वाढला. स्ट्रीट फ्यूचर्स मध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून आलं. 

विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात खरेदी केली. बुधवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 3936 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 2513 कोटी रुपयांच्या नफ्याची वसुली केली. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या डॉ. वीके विजयकुमार यांच्या माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदारांकडून लार्ज कॅप स्टॉक्समध्ये खरेदी करण्यात आली.

भारत अमेरिका व्यापार कराराची शक्यता

येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराची शक्यता आहे. अमेरिका ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियासह भारताला प्रमुख साथीदार मानतो. त्यामुळं दोन्ही देशांमध्ये व्यापार सहकार्य करार होऊ शकतो. अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या काळात भारतीय  निर्यातदारांना संधी मिळू शकते. 

लार्ज कॅप शेअरमध्ये खरेदी

शेअर बाजारातील ब्लू चिप कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी झाली. भारती एअरटेल, झोमॅटो, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा आणि स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाले.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)