मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात तेजी पाहायला मिळाली होती. या आठवड्यात शेअर बाजारात काय घडणार ते पाहावं लागणार आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाल्यामुळं त्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला होता. सेन्सेक्सवरील टॉप  10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं होतं. 5 जानेवारीला शेअर बाजारात मोठ्या आणि मिडकॅप स्टॉक्सवर गुंतवणूकदारांचं लक्ष राहू शकतं. 

कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेले तिमाहीचे निकाल, मोठ्या ऑर्डर आणि फंड मिळवण्यासाठी कंपन्यांच्या योजना याच्या अपडेटमुळं काही स्टॉकमध्ये तेजी किंवा घसरण सुरु होऊ शकते. 

ONGC 

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामळं ओएनजीसीचा स्टॉक चर्चेत राहू शकतो. कच्चा तेलाच्या दरात तेजी किंवा घसरण दिसू शकते. ओएनजीसी विदेश लिमिटेडद्वारे कंपनीची पेट्रोलेरा इंडोवेनेजोलाना SA मध्ये 40 टक्के पेट्रो कैराबोबो SA मध्ये 11 टक्के आणि कैराबोबो इंजीनियरिया वाय कन्स्ट्रक्शन्स SA मध्ये 37.93 भागीदारी आहे. 

IndusInd Bank

इंडसइंड बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नव्या संधींच्या शोधासाठी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या माहितीनुसार हेड ऑफ कस्टमर मॅनेजमेंट राणा विक्रम आनंद आणि हेड ऑफ वेल्थ पॅरा  बँकिंग अनिश बहल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 

वेदांता

तिसऱ्या तिमाहीत कंपनीनं विक्रमी अॅल्यूमिनिअम आणि अॅल्यूमिना उत्पादन केलं आहे. अॅल्यूमिनिअम उत्पादन 620 किलोटन आणि अॅल्यूमिना  उत्पादन 794 किलोटन करण्यात आलं आहे. नऊ महिन्यात अॅल्यूमिना उत्पादन 2034 किलोटन झालं आहे. जे वार्षिक आधारावर 32 टक्क्यांनी जास्त आहे. 

पंजाब नॅशनल बँकेच्या तिसऱ्या तिमाहीत कर्जाची वाढ 11 टक्के झाली असून कर्ज खातं  12.32 लाख कोटींवर पोहोचलं आहे. तर, ठेवी 8.5 टक्क्यांनी वाढून 16.6 लाख कोटींवर पोहोचल्या आहेत.   

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसनं डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत  17600 कोटी रुपयांचं कर्ज वितरण केलं. जे वार्षिक आधारावर 7 टक्क्यांनी अधिक आहे. बिझनेस असेटस 12 टक्क्यांनी वाढून 1.29 लाख कोटींवर पोहोचलं आहे. 

बँक ऑफ इंडियानं तिसऱ्या तिमाहीत कर्ज वितरणात 15 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेचं कर्ज खात 6.28 लाख कोटींवर पोहोचलं आहे. ठेवी 11.6 टक्क्यांनी वाढून  8.87 लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)