मुंबई: मोतीलाल ओसवालनं टाटा कंझ्युमर प्रॉडक्टस, दालमिया भारत आणि महानगर गॅस या स्टॉकला बाय रेटिंग दिलं आहे. शेअर बाजारात घसरण सुरु असताना या स्टॉकला बाय रेटिंग देण्यात आलं आहे. या तीन स्टॉक्समध्ये येत्या काळात 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

टाटा कंझ्युमर प्रॉडक्टस

मोतीलाल ओसवालकडून टाटा कंझ्युमर प्रॉडक्टसला देण्यात आलेलं बाय रेटिंग कायम ठेवण्यात आलं आहे. या स्टॉकचं टारगेट प्राइस 1270 रुपये ठेवण्यात आलं आहे. सध्या हा  स्टॉक 1072.80 रुपयांवर आहे. 

चहाच्या किमती घटल्यानं चहा व्यवसायातील वाढत्या नफ्यामुळं आणि कापणीच्या हंगामात चहाच्या पीकाच्या  कापणीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं पेय उद्योगातील कंपन्यांचा नफा वाढू शकतो. 

कंपनीच्या व्यवसायातील वाढ दुसऱ्या तिमाहीत देखील कायम राहू शकते. पेय उद्योगातील चांगली कामगिरी आंतरराष्ट्रीय व्यवसायात या  आर्थिक वर्षात कायम राहील असा अंदाज आहे.  मोतीलाल ओसवालच्या अपेक्षेनुसार टाट कंझ्युमर प्रॉडक्टसचं उत्पन्न 10 टक्के सीएजीआरनं वाढेल.EBITDA 12 टक्के आणि निव्वळ नफा 13 टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. 

दालमिया भारत 

दालमिया भारतची ऑपरेटिंग कामगिरी ब्रोकरेजच्या अंदाजापेक्षा चांगली राहिली. मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार कोअर मार्केटमध्ये लवचिक दरांमुळं आणि मान्सून नंतर दक्षिण आणि पूर्व भारता सिमेंटची मागणी वाढेल  यामुळं कंपनीचा नफ वाढण्याचा अंदाज आहे.  याशिवाय कंपनीच्या मध्यम ते दीर्घकालीन विस्ताराच्या योजना आहेत. त्यामुळं  कंपनीला कोअर मार्केटमधील स्पर्धेत टिकणं शक्य होईल.  

मोतीलाल ओसवालनं दालमिया भारतला बाय रेटिंग दिलं असून स्टॉकचं टारगेट प्राइस 2660 रुपये ठेवलं आहे. स्टॉकमध्ये 17 टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. 

मोतीलाल ओसवालच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-28 ते दरम्यान 7 टक्के सीएजीआर असेल. आर्थिक वर्ष 2025-26 साठी EBITDA 1130 रुपये असेल. 

महानगर गॅस

मोतीलाल ओसवालनं महानगर गॅसला बाय रेटिंग दिलं आहे. टारगेट प्राइस 1700 रुपये पुढील 12 महिन्यांसाठी म्हणजेच 15 टक्के वाढीचा अंदाज आहे.  कंपनीकडून राबवण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या अभियानामुळं हे शक्य होईल असा अंदाज आहे. ओईएमसोबत सांमजस्य करार करुन व्यावसायिक सीएनजी वाहनांमध्ये रुपंतांतर आणि नव्या सीएनजी पीएनजी ग्राहकांना सवलत दिल्यानं कंपनीच्या आर्थिक वर्ष 25-27 या कालावधीत  9 टक्के सीएजीआरनं वॉल्यूम वाढीचा अंदाज आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून आगामी काळात केल्या जाणाऱ्या बदलांचा परिणाम देखील महानगर गॅसच्या व्यवस्थापनाकडून EBITDA चा मार्जिन इम्पॅक्ट 0.6-0.7 ठेवण्याबाबत मार्गदर्शन केलंय. 

मोतीलाल ओसवालनं महागनर ग्राहकांना खर्च वाढवून देण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत असल्याचं म्हटलं. आर्थिक वर्ष 2025-26 साठी EBITDA/scm 1 रुपयांनी कमी केलं आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)