एक्स्प्लोर

Share Market :  सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  

Share Market : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली.

मुंबई: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारातदेखील आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सेन्सेक्स आणि निफ्टी 4 टक्क्यांनी वधारले.

Share Market : गुंतवणूकदारांनी 17 लाख कोटी कमावले

सेन्सेक्स निर्देशांक आज 2946 अंकांनी म्हणजेच 3.95 टक्क्यांनी वधारून 77562.90 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 874 अंकांनी वाढून 23997.35 वर पोहोचला आहे. 

शेअर बाजारात निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे.  निफ्टी बँक, निफ्टी रिअल्टी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक 7  टक्क्यांनी वधारले. तर इंडिया विक्स निर्देशांक 20 च्या खाली आला. 

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 429 लाख कोटींवरुन 17 लाख कोटींनी वाढून 446 लाख कोटींवर पोहोचलं म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 17 लाख कोटींची वाढ झाली आहे. 

शेअर बाजारातील तेजीची कारणं?

भारतीय शेअर बाजारामधील तेजीमागं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली दोन आठवड्यांची शस्त्रसंधी होय. इराणनं या दोन आठवड्यांच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना मार्गक्रमण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीमुळं क्रूड ऑईलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. क्रूड ऑईलचे दर 95 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील पुढील चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. 

भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल खरेदी करत असल्यानं क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यानं भारतीयांना दिलासा मिळणार आहे. 

डॉलरच्या तुलनेत रुपया भक्क झाल्यानं देखील भारताला फायदा होणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 50 पैशांनी मजबूत होऊन 92.56 रुपये डॉलरवर पोहोचला.

सकारात्मक जागतिक संकेतांमुळं भारतीय शेअर बाजारावर तेजी दिसून आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आल्यानं आशियाई बाजारांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. कोरिया, जपानच्या शेअर बाजारात 6 टक्के वाढ दिसून आली.    

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट आज जाहीर केला. रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवत आरबीआयनं कर्जदारांना दिलासा दिला असला तरी महागाईचं मोठं आव्हान कायम असणार आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका, तेलाच्या किमती गगनाला, महागाईनं मोडला दोन वर्षाचा विक्रम, अर्थव्यवस्थेवर  परिणाम
इराणसोबतच्या युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका, तेलाच्या किमती गगनाला, महागाईनं मोडला दोन वर्षाचा विक्रम, अर्थव्यवस्थेवर  परिणाम
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
गुजरातच्या जामनगरमध्ये 'वाईल्डलाईफ अँड व्हेटर्नरी युनिव्हरसिर्टी' स्थापन होणार, अनंत अंबानींच्या वनताराचं पाऊल
गुजरातच्या जामनगरमध्ये 'वाईल्डलाईफ अँड व्हेटर्नरी युनिव्हरसिर्टी' स्थापन होणार, अनंत अंबानींच्या वनताराचं पाऊल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget