(Source: ECI | ABP NEWS)
Share Market : FPI ची 1.34 लाख कोटींच्या शेअर विक्री, भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सावरला, पाहा काय केलं?
Share Market : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 2025 मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीत 1 लाख 34 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून घसरण सुरु आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदल, अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला विजय, ट्रम्प यांनी टॅरिफ वॉरचा दिलेला इशारा, डॉलरची मजबुती आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून होणाऱ्या विक्रीमुळं भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. भारतीय कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीतील कमजोर निकाल यामुळं शेअर बाजार घसरत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी केवळ दोन महिन्यात 1.34 लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.
विदेशी गुंतवणूकदरांकडून विक्री, निर्देशांकात घसरण
विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून झालेल्या विक्रीचा निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण झाली. निफ्टी 50 निर्देशांक 4.64 टक्क्यांनी घसरला,सेन्सेक्स 4.5 टक्क्यांनी घसरला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 13 टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्स 18 टक्क्यांनी घसरला आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1.34 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तरी 1.29 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या दोन महिन्यात केली आहे. ही गुंतवणूक देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केली आहे.
अमेरिकन बाजारात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत डॉलर्समध्ये 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. डॉलर मजबूत होत असल्यानं विदेशी गुंतवणूकदारांनी विकसनशील होणाऱ्या अर्थव्यवस्थांकडे पाठ फिरवून अमेरिकेतील बाजारात गुंतवणूक केली.
गुंतवणूकदारांनी कोणती भूमिका घ्यावी ?
बोनान्झा पोर्टफोलिओ चे वरिष्ठ संशोधक विश्लेषक राजेश सिन्हा यांनी भारतीय स्टॉक मार्केटचं भवितव्य विविध घटकांवर अवलंबून असेल, असं म्हटलं. कॉर्पोरेट कंपन्यांची कमाई आणि जागतिक बाजारातील लिक्विडीटी मार्केटच्या चांगल्या कामगिरीसाठी फायदेशीर ठरेल. देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्यास दीर्घकालीन विकासासाठी फायेदशीर ठरेल. मात्र, जागतिक अनिश्चितता, अमेरिकेचं टॅरिफ धोरण यामुळं गुंतवणूकादांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतात.
सिन्हा पुढं म्हणाले की विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री सुरु आहे. यामुळं कमी कालावधीसाठी अशा घडत असताना दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत गुंतवणूकदारांनी विविध पोर्टफोलिओत गुंतवणूक करावी. कमी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास जागतिक ट्रेंडचा फटका बसू शकतो. ग्राहकोपयोगी वस्तू आणि औषध कंपन्यांच्या स्टॉकमध्ये स्थिरता पाहायला मिळू शकते. गुंतवूकदरांनी ज्या कंपन्यांचं फंडांमेंटल चांगलं आहे, वाढीची क्षमता आहे त्यात गुंतवणूक करावी. नियमितपणे पोर्टफोलिओचं संतुलन करुन घ्यावं, असं सिन्हा म्हणाले.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

























