मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून उद्या पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. आरबीआय रेपो रेट कायम ठेवण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 503.76 अंकांच्या घसरणीसह 83313.93 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक133 अंकांच्या घसरणीसह 25642.80 अंकांवर बंद झाला. 

Continues below advertisement

मेटल शेअरवर सर्वाधिक दबाव पाहायला मिळाला. निफ्टी निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक आणि हेल्थकेअरमध्ये देखील तेजी घसरण सुरु होती. निफ्टी निर्देशांकात थोडी तेजी दिसून आली. शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीचा खेळ सुरु असताना बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 2.52 लाख कोटी रुपयांनी घसरलं. म्हणजेच गुंतवणूकदारांचं 2.52 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य  बुधवारी 4,69,16,207.26  कोटी रुपये होते. त्यात आज घसरण पाहायला मिळाली. बीएसईचं आजचं बाजारमूल्य  4,66,63,868.67 कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच आजच्या दिवसात गुंतवणूकदारांचं 252338.59 कोटी रुपयांचं नुकसान झालं. 

Continues below advertisement

सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी केवळ तीन कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. सर्वाधिक तेजी ट्रेंट, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये दिसून आली.  तर, सर्वाधिक घसरण इटरनल, एअरटेल, भेलच्या शेअरमध्ये दिसून आली. 

बीएसईवर आज 4342 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1727 शेअर तेजीसह बंद झाले. तर,2447 शेअरमध्ये घसरण झाली. 158 शेअरमध्ये कोणताही घसरण झाली नाही. 75 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 94 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)