Share Market Opening Bell : आज शेअर बाजारात संमिश्र व्यवहार पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सनं (Sensex) उसळी घेतली असली तरी निफ्टी (Nifty 50) मात्र घसरला आहे. सेन्सेक्स किंचित वाढीसह व्यवहार करत असून निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजाराला जागतिक बाजारातून कोणताही पाठिंबा मिळत नाही. मेटल आणि आयटी शेअर्समध्ये घसरणी झाली आहे. तर ऑटो सेक्टरचे शेअर्स काहीसे तेजी असल्याचं चित्र सुरुवातीच्या सत्रात आहे.


कशी झाली सुरुवात?


शेअर बाजाराच्या आजच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक 58.26 अंकांच्या वाढीसह 59,346.61 वर उघडला. याशिवाय, एनएसई (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 9.45 अंकांच्या घसरणीसह 17,383.25 वर उघडला आहे.


सेन्सेक्सची उसळी, निफ्टी मात्र गडगडला


आज शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स किंचित तेजीसह उघडला तर, निफ्टी मात्र गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वाढीसह हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. मेटल आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्सचा बाजारावर दबाव आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 5.5 टक्क्क्यांच्या घसरणीसह निफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये आघाडीवर आहे. सिप्ला आणि अदानी पोर्ट देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, बजाज ऑटो आणि M&M या शेअर्सची घोडदौड सुरु आहे.


'या' शेअर्सची कमाई


आज सुरुवातीच्या सत्रात एम अँड एम, टाटा मोटर्स, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एल अँड टी, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, विप्रो सन फार्मा, मारुती आणि आयटीसी हे शेअर्स चांगली कमाई करताना दिसत आहेत.


'या' शेअर्समध्ये घसरण


शेअर बाजारात आज कोटक बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट एचसीएल, एसबीआय या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून ये आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Petrol Diesel Price : दिलासा की खिशाला झळ? कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा...