Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीसह (Share Market Opening Bell) सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताने भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) 59,196.96 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty) 17,568.15 अंकांवर खुला झाला. 


बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी दिसून आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांनी वधारत 59,288.54 अंकांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 86 अंकांनी वधारत 17,573.25 अंकावर व्यवहार करत होता. 


'शेअर इंडिया' चे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज दिवसभर बाजार  17300-17600  अंकांच्या दरम्यान व्यवहार करण्याची अधिक शक्यता आहे. आज बाजारात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मीडिया, ऑटो, रियल्टी आणि एनर्जी क्षेत्रात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. फार्मा, वित्तीय सेवा, आयटीसह स्मॉलकॅपमध्ये विक्री दिसू शकते. 


बँक निफ्टीतही आज तेजी राहण्याचा अंदाज डॉ. रवी सिंह यांनी वर्तवला. बँक निफ्टी 40200-40700 या दरम्यान व्यवहार करण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.


सेन्सेक्समध्ये आज 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी दिसून आली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंटस, टायटन, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


तर, आयटीसी, विप्रो, टीसीएस, एचयूएल, नेस्ले इंडस्ट्रीज, टाटा स्टील, इन्फोसिस, सन फार्मा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 


मंगळवारी बाजारात तेजी 


मंगळवारी शेअर बाजार (Share Market Closing Bell) बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 549 अंकाची वाढ नोंदवण्यात आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी175 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,960 अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये 1.01 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,487 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही 398 अंकांची वाढ होऊन तो 40,318 अंकांवर पोहोचला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Reliance Jio: रिलायन्स जिओचा मोठा डाव; हायस्पीड 5 जी साठी 'या' कंपन्यांसोबत मोठा करार