Share Market Opening Bell: आज भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह (Share Market Opening) झाली. जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून (Positive Trend in Share Market) आल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. अमेरिकन शेअर बाजार तेजीत बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही तेजी दिसून आली. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे. मागील काही दिवसांपासून विक्रीचा जोर दिसत असलेल्या आयटी सेक्टरमध्ये आज खरेदीचा जोर दिसत आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 113 अंकांनी वधारता 62,243 वर तर निफ्टी (Nifty) 35 अंकांनी वधारत 18532 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 60 अंकांच्या तेजीसह 62,190.88 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 20 अंकांच्या तेजीसह 18,518.10 अंकांवर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 पैकी 30 कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. तर, 19 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांकात महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 1.42 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, हिरोमोटो कॉर्पच्या शेअर दरात 1.32 टक्के, टाटा मोटर्सच्या 1.15 टक्के, अॅक्सिस बँकच्या 0.99 टक्के, इंडसइंडच्या बँकेच्या शेअर दरात 0.97 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, अपोलो हॉस्पिटल, युपीएल, बीपीसीएल, टायटन, भारती एअरटेल आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 43,793.70 अंकांवर खुला झाला. त्याने आज 43,900.90 उच्चांक गाठला. त्यानंतर काही प्रमाणात घसरण झाली. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास 43,878 च्या पातळीवर बँक निफ्टी व्यवहार करत आहे.
सोमवारी बाजारात अस्थिरता
सोमवारी शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये एका अंकाची वाढ नोंदवण्यात आली. दिवसअखेर सेन्सेक्स 62,130 अंकांवर, तर निफ्टी 18,497 अंकांवर स्थिरावला. सोमवारी, शेअर बाजार बंद होताना एकूण 1787 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1688 शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 194 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.