Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market Updates) दिसून आला. शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा बाजार किंचीत वधारला होता.
आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 5.90 अंकांच्या किंचीत तेजीसह 61,630.05 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 33.60 अंकांनी वधारत 18,362.75 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 72.87 अंकांच्या घसरणीसह 61,551.28 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 21.20 अंकांच्या घसरणीसह 18,307.95 अंकांवर व्यवहार करत होता.
सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली होती. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 15 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्समध्ये आज अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, डॉ. रेड्डीज लॅब, पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एसबीआय, बजाज फायनान्स, मारुती, एचयूएल आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
तर, विप्रो, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, एचसीएल टेक, सन फार्मा, टेक महिंद्रा, टीसीएस आणि आयटीसी कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
आज बँकिंग, ऑटो, वित्तीय सेवा, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅसच्या शेअर दरात तेजी दिसून येते. तर, एफएमसीजी, आयटी, मेटल फार्मा, हेल्थकेअर आणि रियल्टी इंडेक्समध्ये घसरण दिसून येत आहे.
सोमवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1089.41 कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. तर, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 47.18 कोटींची गुंतवणूक केली.