Share Market Updates: मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. देशातील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली होती. या आठवड्यात जागतिक स्तरावरील घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका या आधारे बाजाराची दिशा निश्चित होण्याचा अंदाज आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी Tata Motors, GMR Airports Infrastructure, Phoenix Mills,Tech Mahindra, Dilip Buildcon या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो. 


बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने टाटा मोटर्सची उपकंपनी टीएमएनएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्यूशनसह एक करार केला आहे. या करारानुसार, कंपनी बेंगळुरूमध्ये 921 इलेक्ट्रीक बस चालवणार आहेत. हा करार 12 वर्षांसाठी झाला आहे. 


जीएमआर एअरपोर्ट्स इंटरनॅशनल बीव्ही, जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी आहे. या कंपनीला जीएमआर मेगावाइड सेबू एअरपोर्ट कॉर्पोरेशनमधील (GMR Megawide Cebu Airport Corporation)  शेअर्सच्या विक्रीतून 1,389.90 कोटी रुपये मिळाले आहेत. टिळकनगर इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार Think India Opportunities Master Fund LP यांना प्रत्येकी 95 रुपये दराने 1.05 कोटी शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली आहे. फिनिक्स मिल्सने गुजरातमधील सूर येथे 510 कोटी रुपयांना 7.22 एकर जमीन खरेदी केली आहे. टेक महिंद्राने त्यांची उपकंपनी Dynacommerce Holdings BV मधील 100 टक्के हिस्सा विक्रीला मान्यता दिली आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीला तेलंगणामध्ये रस्ता बांधण्यासाठी NHAI कडून 1647 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. 


या शेअर्समध्ये दिसू शकतो चढ-उतार 


Moving Average Convergence Divergence  (MACD) इंडिकेटरनुसार, Ugar Sugar Works, KCP Sugar, Dwarikesh Sugar, Kothari Sugar च्या शेअर दरात तेजी दिसून येण्याची शक्यता आहे. तर, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ऑइल,L&T Finance Holdings, HUDCO  या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येण्याची शक्यता आहे. 


(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)  


इतर महत्त्वाच्या बातम्या: