Share Market Closing Bell : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात तेजी आल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक  (BSE) सेन्सेक्समध्ये (Sensex) 445 अंकाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टीमध्ये (Nifty) आज 119 अंकांची वाढ झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्समध्ये आज 0.77 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,074 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,107 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बँकमध्येही आज 532 अकांची वाढ झाली. 


आज बाजार बंद होताना एकूण 1923 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1487 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 134 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना HDFC Life, Reliance Industries, Bajaj Finance, Bajaj Auto आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर HUL, Power Grid Corp, Britannia Industries, Tech Mahindra आणि TC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. 


आज शेअर बाजारात बँक आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आज अर्ध्या टक्क्याची वाढ झाली आहे. 


Stock Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात तेजीने 


आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स  334.32 अंकांच्या म्हणजेच 0.58 टक्क्यांच्या वाढीसह  57,963.27 च्या पातळीवर उघडला. याशिवाय, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 72 अंकांच्या म्हणजेच 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 17,060.40 वर उघडला.


या शेअर्समध्ये वाढ झाली



  • HDFC Life- 3.76 टक्के

  • Reliance- 3.11 टक्के

  • Bajaj Finance- 2.87 टक्के

  • Bajaj Auto- 2.65 टक्के

  • Titan Company- 2.20 टक्के


या शेअर्समध्ये घसरण झाली



  • HUL- 1.94 टक्के

  • Power Grid Corp- 1.91 टक्के

  • Britannia- 1.55 टक्के

  • Tech Mahindra- 1.20 टक्के

  • TCS- 1.18 टक्के


अदानी ग्रुपच्या शेअर्सची मोठी खरेदी 


अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये (Adani Group Shares Deal) आज मोठ्या प्रमाणात ब्लॉक डील होताना दिसली. सोमवारी अदानी समूहाने सार्वभौम संपत्ती निधीतून 300 दशलक्ष डॉलर्स निधी प्राप्त झाल्याचा दावा करणारे सर्व अहवाल फेटाळून लावले. यानंतर आज ग्रुप कंपन्यांच्या शेअर्ससाठी ब्लॉक डील विंडोमध्ये प्रचंड रस आहे.


आज, 5520 कोटी रुपयांच्या अदानी एंटरप्रायझेसचे सुमारे 3.9 कोटी शेअर्स म्हणजेच 3.5 टक्के शेअर्सचे व्यवहार झाले. अदानी पोर्ट्समध्ये 4.1 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 2.5 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 3.5 टक्के समभागांचे ब्लॉक डील झाले होते.


ही बातमी वाचा: 



  • Gold Rate Today : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण, जळगावात जीएसटीसह भाव किती?