Share Marker Closing Bell: नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला. शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्स निर्देशांकाने (BSE Sensex) 61 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांच्या तेजीसह 61,168 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 92 अंकांच्या तेजीसह 18,197 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील दिवसभरातील व्यवहार करणाऱ्या 2254 कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1245 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 177 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. शेअर बाजारातील आज दिवसभरातील व्यवहारात मेटल्स स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. मेटल्स स्टॉक्समध्ये तीन टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिअल्टीच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची तेजी दिसली. चीनने देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी निर्यात शुल्कात वाढ केली. त्याच्या परिणामी मेटल्सच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली आहे.
निफ्टी निर्देशांकात टाटा स्टील, हिंदाल्को, ओएनजीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. टायटन, एशियन पेंट्स, डिव्हिज लॅब, बजाज ऑटो आणि हिरो मोटो कॉर्पच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
आज शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, आयटी, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेटमधील सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, फार्मा, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू सेक्टरच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 30 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा उत्साह दिसला. तर, 20 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 22 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
आज बाजारात दिसून आलेल्या तेजीच्या परिणामी मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवलही मोठ्या प्रमाणावर वाढले. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 283.85 लाख कोटी रुपये झाले. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी बाजार भांडवल 282.44 लाख कोटी रुपये इतके होते.
आज शेअर बाजार उघडताना बीएसई (BSE) सेन्सेक्स 30.50 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 60,871.24 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 26.40 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 18,131.70 वर उघडला.