Sensex Closing Bell :  गेल्या तीन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज आठवड्यातील ट्रेडिंगचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) चांगलाच फायदेशीर ठरला. बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला. आयटी (IT Sector) आणि बँकिंग (Banking Sector) शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. मिड कॅपमध्ये ही तेजी दिसली.

आज दिवसभरातील व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 480 अंकांच्या तेजीसह 65,721 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136 अंकांच्या तेजीसह 19,517 अंकांवर बंद झाला.

कोणत्या सेक्टरमध्ये तेजी-घसरण 

आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस हे सेक्टर तेजीसह बंद झाले. तर, ऑटो आणि एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 30 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

इंडेक्‍सकिती अंकांवर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex65,721.2565,799.2765,387.180.74%
BSE SmallCap35,070.6535,187.6934,958.790.66%
India VIX10.5711.1910.48-5.48%
NIFTY Midcap 10037,630.6037,715.0537,419.750.82%
NIFTY Smallcap 10011,698.0511,765.1011,669.200.76%
NIfty smallcap 505,297.305,334.255,280.300.74%
Nifty 10019,448.7519,472.5019,378.400.71%
Nifty 20010,337.3510,348.7510,298.700.73%
Nifty 5019,517.0019,538.8519,436.450.70%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.71लाख कोटी रुपयांची वाढ

आज मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4 ऑगस्ट रोजी 304.00 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गुरुवारी, बाजार भांडवल 302.29 लाख कोटी होते. आज बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे  BSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 1.71 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. 

2,236 समभाग वधारले

मुंबई शेअर बाजारावर  (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. शेअर बाजारात आज एकूण 3,720 शेअर्सचा व्यवहार झाला. यापैकी 2,236 शेअर्स तेजीसह बंद झाले. त्याच वेळी 1,335 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 149 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 253 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 28 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला.