Share Market LIVE Updates: गुडीपाढव्याच्या निमित्ताने आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक काहीसे वधारल्याचं दिसून आलं. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार (Share Market Closing Bell) आज सकारात्मक बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 139 अंकांनी वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (NIFTY) आज 44 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.24 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,214 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये आज 0.26 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,151 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 104 अंकांची वाढ होऊन तो 39,999 अंकांवर पोहोचला.
शेअर बाजाराच आज सकाळपासूनच मोठी अस्थिरता असल्याचं दिसून आलं. आज एकूण 1993 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1421 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 128 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बाजार बंद होताना HDFC Life Insurance, Bajaj Finance, Bajaj Finserv, Sun Pharma आणि Tata Consumer Products कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर BPCL, Coal India, NTPC, Adani Ports आणि Axis Bank च्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज फार्मा इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये आज काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आज 0.5 टक्क्यांची वाढ झाली.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- HDFC Life- 3.05
- Bajaj Finance- 2.17
- Bajaj Finserv- 2.09
- Sun Pharma- 1.66
- TATA Cons. Prod- 1.43
या शेअर्समध्ये घट झाली
- BPCL- 1.88
- NTPC- 1.55
- Coal India- 1.43
- Adani Ports- 1.15
- Axis Bank- 0.70
ही बातमी वाचा: