Sensex Update: शेअर मार्केटमध्ये आज जोरदार घसरण झालेली पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 949 अंकांनी (1.65%) घसरून 56747 वर बंद झालाय. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 284 अंकांनी (1.65%) घसरून 16912 वर बंद झालाय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारा मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.


सेन्सेक्समधील सर्व शेअरमध्ये घसरण 
सेन्सेक्समधील 30 शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. यात डसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि एचसीएल टेक यांचा समावेश आहे. या सर्व शेअरमध्ये तीन टक्क्यांहून जास्त घसरण झालीय. बाजारातील मोठ्या घसरणीमुळं मार्केट कॅप 4.29 लाख कोटी रुपयांनी घटली. शुक्रवारी ते 261.02 लाख कोटी रुपये इतके होते, जे आज 256.73 लाख कोटी रुपयांवर बंद झाले.


निफ्टीतही मोठी घसरण
निफ्टीतही आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आयटी निर्देशांक 2 टक्क्यापेक्षा जास्त खाली आला. दुसरीकडे, ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा देखील सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरले. निफ्टी मिडकॅप, बँक आणि वित्तीय निर्देशांक 1.20-1.20 टक्क्यानं घसरून बंद झाला.


सोमवारी सगळे सेक्टर्स घसरणीसह बंद झाले. सर्वांत अधिक घसरण आयटी शेअर्स (-2.70 टक्के) मध्ये दिसून आली. अनेक बड्या कंपन्यांबाबत बोलायचं झालं तर बीएसईमध्ये सगळ्या मोठ्या कंपन्यांचे शेअर लाल निशाण्यावर बंद झाले. सर्वांत जास्त घसरण इंडसइंड बँकमध्ये दिसून आली. 


याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 765 अंकांनी (1.31%) घसरून 57,696 वर बंद झाला होता. निफ्टी 205 अंकांनी (1.18%) घसरून 17,196 वर बंद झाला होता. पॉवर ग्रिडचे शेअर्स 4% घसरून बंद झाले तर कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 2% पेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha