Share Market Closing Bell:  मागील काही दिवसांपासून घसरण दिसून येत असलेल्या शेअर बाजारात (Share Market) आज खरेदीचा जोर दिसून आला. गुंतणूकदारांकडून आज बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sesnex) 800 हून अधिक अंकांनी वधारला. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty) 200 हून अधिक अंकांनी वधारला. 

आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 846 अंकांनी वधारत 60,747.31 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 241.75 अंकांच्या तेजीसह 18,101.20 अंकावर बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 43 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 7 शेअर्समध्ये घसरण दिसली. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, तीन कंपन्यांचे शेअर दर घसरले. 

खरेदीचा उत्साह

शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीच्या उत्साहामुळे सेन्सेक्स 1000 अंकांपर्यत वधारला होता. तर, निफ्टीने आज, दिवसभरात 18,141.40 अंकांची पातळी गाठली होती. बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1986  कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1542  कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 155 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

इंडेक्स किती अंकावर बंद झाला  दिवसभरातील
उच्चांक
आजचा नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 60,717.76 60,889.41 60,109.94 00:19:35
BSE SmallCap 28,928.41 29,072.57 28,858.84 0.50%
India VIX 14.65 15.38 14.53 -2.48%
NIFTY Midcap 100 31,716.65 31,760.45 31,533.85 0.01
NIFTY Smallcap 100 9,709.50 9,765.35 9,682.40 0.01
NIfty smallcap 50 4,342.20 4,372.00 4,334.75 0.0035
Nifty 100 18,248.55 18,276.25 18,098.00 0.01
Nifty 200 9,557.90 9,569.80 9,486.95 0.01
Nifty 50 18,101.20 18,141.40 17,936.15 0.01


शेअर बाजारातील आज दिवसभराच्या व्यवहारात ग्राहकोपयोगी सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, एनर्जी, मेटल्स, ऑइल अॅण्ड गॅस आणि एफएमसीजी सेक्टर तेजीसह बंद झाले.  मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात तेजी दिसून आली.