HDFC Bank-SEBI Update मुंबई: एखाद्या सामान्य नागरिकानं प्राप्तिकर भरला नाही किंवा त्याच्या व्यवसायासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यास उशीर केल्यास दंड भरावा लागतो. यामध्ये त्या व्यक्तीचं नुकसान होतं. मात्र, जेव्हा देशातील खासगी क्षेत्रातील बँक नियामक संस्था सेबीकडे कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करणं विसरून जाते तेव्हा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सेबीनं कारवाई केल्यास शेअर बाजारात त्यांना फटका बसू शकतो, गुंतवणूकदारांना देखील आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. एचडीएफसी बँकेसोबत असाच प्रकार घडला आहे. बँकेनं स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की सेबीनं त्यांना फटकारलं आहे. पुढे अशी चूक करु नये म्हणून समज देखील देण्यात आली आहे. हे प्रकरण अरविंद कपिल यांच्याशी संबंधित आहे.
एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य आणि मॉर्गेज हेड अरविंद कपिल यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. मात्र, बँकेनं राजीनामा तीन दिवस लपवून ठेवला. तीन दिवसानंतर बँकेनं सेबीला कळवलं की अरविंद कपिल यांनी त्यांच्या बँकेतील नोकरी सोडली आहे.
उशीर का झाला हे बँकेनं सांगितलं नाही
सेबीनं बँकेला पाठवलेल्या पत्रात म्हटलं की बँक मार्केट नियामक सेबीला महत्त्वाच्या व्यक्तीच्या नोकरी सोडण्यासंदर्भात खुलासा करण्यामधील उशीर कोणत्या कारणानं झाला हे सांगितलं नाही. सेबीनं या प्रकरणाला गांभिर्यानं घेतलं आहे. भविष्यात या प्रकारची चूक न करण्याची समज देखील बँकेला सांगण्यात आलं आहे. बँकेला या निष्काळजीपणासाठी सेबी कायदा 1992 नुसार कारवाई करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.पुढील काळात अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी काय कार्यवाही केली जाईल याची माहिती द्यावी, असंही सेबीनं बँकेला कळवलं आहे. अरविंद कपिल सध्या पूनावाला फिनकॉर्पमध्ये सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
आवश्यक पावलं उचलू
एचडीएफसी बँकेनं सोमवारी सायंकाळी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आलं की सेबीकडून ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील. एचडीएफसी कडून लिस्टिंग नियमाचं उल्लंघन झाल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बँकेला कठोर कारवाईपासून वाचण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे.
इतर बातम्या :
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात 9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी