MS Dhoni SBI Brand Ambassador : दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) आणि माजी क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने रविवारी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) वर मोठी जबाबदारी दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया महेंद्र सिंह धोनीची अ‍ॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (SBI Brand Ambassador) म्हणून एमएस धोनी मार्केटिंग आणि जाहिरातीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.


धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर


स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून एमएस धोनीचा समावेश करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. धोनीच्या एसबीआयसोबतच्या सहकार्यामुळे आमच्या ब्रँडला नवी ओळख मिळणार आहे. हा निर्णय एक भागीदारी आहे. आमचा उद्देश विश्वास, सचोटी आणि अटूट समर्पणाने देश आणि आमच्या ग्राहकांची सेवा करण्याची आमची वचनबद्धता आणखी मजबूत करणे हे आहे.


स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. एसबीआय बँक देशातील सर्वात मोठा कर्जदाता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत 30 लाखाहून अधिक भारतीय कुटुंबांची घर खरेदीची स्वप्ने पूर्ण केली आहेत. बँकेचा गृह कर्ज पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


बँकेत ठेव


जून 2023 पर्यंत, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठेवी 45.31 लाख कोटी रुपये आहेत आणि CASA प्रमाण 42.88 टक्के आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जामध्ये एसबीआयचा बाजारातील हिस्सा अनुक्रमे 33.4 टक्के आणि 19.5 टक्के आहे. SBI कडे 22,405 शाखा आणि 65,627 ATMs किंवा ADWM चे सर्वात मोठे नेटवर्क असून 78,370 बीसी आउटलेट आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या 117 दशलक्ष आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 64 दशलक्ष आहे.


सर्वात मोठा कर्जदाता


डिजिटल कर्ज देण्याच्या बाबतीत, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी YONO च्या माध्यमातून 5,428 कोटी रुपये मंजूर केले आहेत. FY 2024 च्या पहिल्या तिमाहीत फेसबूक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) वर फॉलोअर्सची संख्या सर्व बँकांमध्ये सर्वाधिक आहे.