Samsung Special Offers: सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष फेस्टिव्ह ऑफर सुरु केली आहे. या ऑफरनिमित्त Bespoke AI डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर विशेष डिस्काऊंट दिले जाणार आहे. ही विशेष ऑफर गुढीपाडव्यानिमित्त सुरु करण्यात आली आहे.  


विशेष फेस्टिव्‍ह ऑफर्समध्‍ये निवडक होम अप्‍लायन्‍सेसवर जवळपास 48 टक्‍के सूट, 20,000 रूपयांपर्यंत कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंट आणि विशेष विस्‍तारित वॉरंटीचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त सुरु करण्यात आलेली ही ऑफर ३१ मार्चपर्यंत वैध असणार आहे. या ऑफर्स Samsung.com, आघाडीच्‍या ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहेत.


31 मार्च २०२५ पर्यंत ऑफर


सॅमसंग हा भारतातील ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड आपले AI-पॉवर्ड रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्‍ह्ज आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी देत आहे. उगादी, गुढीपाडवा आणि ईद या सणानिमित्त ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, कुटुंबं समृद्धता आणि नवीन शुभारंभाचे स्‍वागत करण्‍यासाठी तयारी करत असताना सॅमसंग आपल्‍या नवीन इनोव्‍हेशन्‍सवरील विशेष डिल्‍ससह होम अपग्रेड्सना अधिक फायदेशीर करत आहे. 31 मार्च २०२५ पर्यंत ही ऑफर सुरु राहणार असून या ऑफर अंतर्गत ग्राहकांना कमी किंमतीत स्‍मार्टर व अधिक कनेक्‍टेड अप्‍लायन्‍सेस घरी आणण्‍याची संधी मिळणार आहे. ग्राहक निवडक डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर जवळपास 48 टक्‍के सूट, जवळपास 20,000 रूपये कॅश-बॅक आणि सुलभ झीरो डाऊन पेमेंट पर्यायांचा लाभ घेऊ शकतात.


विस्‍तारित वॉरंटी ऑफर्स


निवडक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सवर 2 वर्षांची विस्‍तारित व सर्वमसोवशक वॉरंटीसह 4,290 रूपयांचे सॅमसंग केअर+ 499 रूपयांच्‍या स्‍पेशल किमतीत उपलब्‍ध आहे. तसेच रेफ्रिजरेटर्सवर एफडीआर व एसबीएस मॉडेल्‍ससाठी 499 रूपयांच्‍या आणि 500 लीटरखालील फ्रॉस्‍ट फ्री मॉडेल्‍ससाठी 349 रूपयांच्‍या स्‍पेशल किमतीत 1 वर्षाची विस्‍तारित वॉरंटी ऑफर करण्‍यात आली आहे. सॅमसंग रेफ्रिजरेटर्सच्‍या डिजिटल इन्‍व्‍हर्टर कम्‍प्रेसरवर आणि वॉशिंग मशिन्‍सच्‍या डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर 20 वर्षांची वॉरंटी, मायक्रोवेव्‍ह्जच्‍या सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर 10 वर्षांची वॉरंटी आणि एअर कंडिशनर्सवर 5 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी यासह दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणाची खात्री देत आहे. 


इन्‍स्‍टॉलेशन ऑफर


Bespoke AI विंड फ्री एसी मोफत इन्‍स्‍टॉलेशनसह येतात, ज्‍यामुळे ग्राहकांना कार्यक्षमपणे उच्‍च दर्जाच्‍या कूलिंगचा अनुभव घेता येतो. कंपनीच्या या ऑफर्स Samsung.com वर आणि भारतभरातील निवडक सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहेत. तुम्हाला या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे, कारण ही ऑफर 31 मार्चपर्यंतच उपलब्ध आहे.


आणखी वाचा 


यामाहाचा धमाका! महाराष्ट्रासाठी जाहीर केल्या खास गुढी पाडवा फेस्टिव्ह ऑफर्स