मुंबई : मोबाईल क्षेत्रातील नावाजलेल्या सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या मोबाइल डिवाईसेसची फ्लॅगशिप श्रेणी गॅलॅक्सी एस24 आणि गॅलॅक्सी एस24 च्या एंटरप्राइज एडिशनच्या लाँचची घोषणा केली आहे. ग्राहकांना आवडणारी सर्व गॅलॅक्सी एआय वैशिष्ट्ये, जसे लाइव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रीटर, नोट असिस्ट आणि सर्कल टू सर्च विथ गुगल असलेले हे व्यवसायांसाठी डिझाइन करण्यात आलेले डिवाईसेस डिफेन्स-ग्रेड सुरक्षितता, विस्तारित उत्पादन जीवनचक्र आणि सुधारित दीर्घकालीन सपोर्टसह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. प्रबळ एंटरप्राइज एक्सक्लुसिव्ह सॅमसंग एक्सकव्हर 7 स्मार्टफोनच्या यशस्वी लाँचनंतर फ्लॅगशिप एंटरप्राइज एडिशन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आला आहे.
“सॅमसंगचे एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी एस 24 अल्ट्रा आणि गॅलॅक्सी एस 24 भारतातील झपाट्याने डिजिटाइज होत असलेल्या व्यवसाय वातावरणामध्ये विश्वसनीय, सुरक्षित व व्यवस्थापन करता येण्याजोग्या डिवाईसेससाठी वाढत्या मागणीची पूर्तता करतात. डेटा सुरक्षितता, दीर्घकालीन डिवाईस सपोर्ट आणि जलद अंमलबजावणीची खात्री देत हे डिवाईसेस एंटरप्राइजेजना सक्षम करतात आणि व्यवसाय प्रमुखांना त्यांच्या मोबाइल ताफ्यांबाबत उत्तम दृश्यमानता, नियंत्रण व आत्मविश्वास देतात. व्यवसायांना तंत्रज्ञानाचा विनासायासपणे, सुरक्षितपणे व शाश्वतपणे फायदा घेण्यास, तसेच भारताच्या एंटरप्राइज व्यवसाय विकासाला चालना देण्यास सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्या एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्यक्ष आकाश सक्सेना यांनी यावेळी म्हटले.
स्मार्टफोनची वैशिष्टे
एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रामध्ये प्रबळ १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमता आहे, तर एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी एस२४ मध्ये कार्यक्षम ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमता आहे. हे डिवाईसेस सातत्यपूर्ण व विश्वसनीय पॅच मॅनेजमेंट, स्थिर डिवाईस उपलब्धता आणि सतत ओएस व्हर्जन अपडेट्ससह विनासायास परफॉर्मन्सची खात्री देतात.
किंमत आणि कुठे खरेदी करता येईल
कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहक Samsung.com आणि सॅमसंग कॉर्पोरेट+ पोर्टल www.samsung.com/in/corporateplus येथे एंटरप्राइज एडिशन एस२४, एस२४ अल्ट्रा आणि शक्तिशाली गॅलॅक्सी एक्सकव्हर७ स्मार्टफोन्स खरेदी करू शकतात. डिवाईसच्या ३ वर्षांच्या वॉरंटीचा कलावधी जागतिक स्तरावर २०२४ मध्ये लाँच करण्यात आलेल्या सर्व एंटरप्राइज एडिशन डिवाईसेससाठी एप्रिल २०२४ पासून असेल आणि त्यानंतर फक्त एस२४ (ओनिक्स ब्लॅक, ८/२५६ जीबी) आणि एस२४ अल्ट्रा (टायटॅनियम ब्लॅक, १२/२५६ जीबी) साठी लागू असेल. बॅटरी स्टॅण्डर्ड वॉरंटी १२ महिने असून अॅक्सेसरीजसाठी ६ महिन्यांची वॉरंटी आहे. अॅक्टिवेशन तारखेपासून विनामूल्य १-वर्ष नॉक्स सूट मिळवा; १ वर्षानंतर प्लॅननुसार सबस्क्रिप्शन शुल्क लागू होतील. वेळ व प्रयत्नासाठी रिसेलरकडून अंमलबजावणी शुल्कांची आकारणी केली जाऊ शकते.
किंमत 78,999 रुपये
• एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी एस२४ आणि गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रासाठी किंमत ७८,९९९ रूपयांपासून सुरू होते
अधिक सुरक्षिततेसाठी रचना
नवीन गॅलॅक्सी एंटरप्राइज एडिशन स्मार्टफोन्स नॉक्स सूटसाठी १२-महिन्याच्या सबस्क्रिप्शनसह येतात, ज्यामधून डिफेन्स-ग्रेड सुरक्षितता, सुव्यवस्थित ईएमएम नोंदणी आणि सर्वसमावेशक डिवाईस/ओएस व्यवस्थापनाची खात्री मिळते. या डिवाईससमधून फ्रण्टलाइन कर्मचाऱ्यांसाठी डेटा-संचालित वापर/सुरक्षितता इनसाइट्स आणि सर्वोत्तम क्षमता देखील मिळतात. सिंडल बंडलमधील सर्वसमावेशक सोल्यूशन्स आयटी अॅडमिन्सना गॅलॅक्सी डिवाईसेस सुरक्षित, अंमलबजावणी, व्यवस्थापित, विश्लेषण व ट्रबलशूट करण्याची सुविधा देतात. दुसऱ्या वर्षापासून नॉक्स सूट सबस्क्रिप्शन ५० टक्के सबसिडी किमतीमध्ये दिले जाते.
व्यापक ओएस आणि सिक्युरिटी सपोर्ट
सॅमसंग एंटरप्राइज एडिशनमध्ये व्यवसायांसाठी अधिक सुरक्षितता आहे, जेथे ग्राहकांना जवळपास ७ वर्षांचे सतत फर्मवेअर अपडेट्स मिळतात. या कटिबद्धतेमधून त्यांचे मोबाइल डिवाईसेस आधुनिक अँड्रॉइड व सॅमसंग सिक्युरिटी पॅचेससह अपडेटेड राहण्याची खात्री मिळते, ज्यामुळे मालवेअर, फिशिंग स्किम्स व सॉफ्टवेअर मालफंक्शन्स अशा मालिशियस जोखीमांपासून संरक्षण होते. सॅमसंग डिवाईसेसची क्षमता कायम राखत एंटरप्राइज एडिशन कंपन्यांना गोपनीयपणे आणि संभाव्य असुरक्षिततांपासून सुरक्षितपणे ऑपरेट करण्यास सक्षम करतात.
विनासायास व्यवसाय कार्यरत राहण्याची खात्री
एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा आणि गॅलॅक्सी एस२४ भारतभरातील कंपन्यांना सर्वसमावेशक ३-वर्ष वॉरंटी देतात, ज्यामधून सतत बाजारपेठ उपलब्धता आणि उच्च-स्तरीय डिवाईसेसच्या विनासायास क्षमतेची खात्री मिळते. यामुळे व्यवसाय विनाव्यत्यय विकासाप्रती त्यांची गती कायम ठेवू शकतात, ज्याला मागणीदायी टास्क्सची हाताळणी करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या स्थिर डिवाईसेसचे पाठबळ आहे.
वापरकर्त्यांना गॅलॅक्सी एआयसह अधिक टास्क करण्याची सुविधा
एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा आणि गॅलॅक्सी एस२४ रिअल-टाइम आवाज व मजूकराच्या भाषांतरासाठी लाइव्ह ट्रान्सलेट व इंटरप्रीटर अशा वैशिष्ट्यांसह कम्युनिकेशनमध्ये वाढ करतात. चॅट असिस्ट संवादात्मक टोन्स सुधारते, तर नोट असिस्ट सॅमसंग नोट्समध्ये सारांश व टेम्पलेट्स तयार करते. ट्रान्सक्रिप्ट असिस्ट वॉईस रेकॉर्डिंग्जचे लिप्यंतरण व भाषांतरासाठी एआय आणि स्पीच-टू-टेक्स्ट तंत्रज्ञानाचा वापर करते.
हेही वाचा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा