नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियासोबत व्यापार करत असल्यानं टॅरिफ वाढवण्याचा इशारा दिला आहे. 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. अमेरिकेकडून रशियासोबतचा व्यापार इतर देशांनी थांबवावा यासाठी दबाव टाकला जात आहे. रशियाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं मॉस्को विरोधातील धमक्या बेकायदेशीर आहेत. देशांना त्यांचा व्यापारी भागीदार कोण आहे हे निवडण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकत नाही, असं म्हटलं. 

रशियाच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकणं, धमकी समजू

क्रेमलिनचे प्रवक्ते, दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की देशांना त्यांचा व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, त्यांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जाऊशकत नाहीत. कोणत्याही देशाला रशियासोबतचा व्यापार बंद करण्यास भाग पाडणं अवैध आहे. रशियाच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकणं धमकी समजली जाईल, अशी पेस्कोव म्हणाले. 

दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की आमचं मत आहे की सार्वभौम देशांना आपले व्यापारी भागीदार, व्यापार, आणि आर्थिक सहकार्य यासाठी भागीदार निवडण्याचा अधिकार असतो, वास्तवात असंच असतं. देशांना आपल्यासाठी व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या शक्यता निवडण्याचा अधिकार देशहिताच्या बाबत असेल.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 24 तासात टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे. भारतानं रशियाकडून तेल आणि इतर लष्करी शस्त्र खरेदी करणं थांबवलं नाही तर टॅरिफ वाढवणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. काल ट्रम्प यांनी एक पोस्ट करत म्हटलं होतं की  भारत फक्त रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत नाही तर खरेदी केलेल्या तेलापैकी एक हिस्सा खुल्या बाजारात विकून नफा कमवत आहे. रशियाकडून युद्ध सुरु असताना यूक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची पर्वा भारताला नाही, त्यामुळं टॅरिफ वाढवत असल्याचं ट्रम्प म्हणाले.  

भारताला निशाणा करणं चुकीचं

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर भारतानं उत्तर दिलं आहे. विदेश मंत्रालयानं उत्तर देत म्हटलं की भारताला निशाणा बनवणं अयोग्य आणि दुहेरी भूमिकेच उदाहरण आहे. भारत एक मोठी अर्थव्यवस्था असून राष्ट्रहितासाठी आर्थिक सुरक्षा आणि रक्षणसाठी आवश्यक ती पावलं उचलणार आहे.