नवी दिल्ली: नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु आहे. नव्या महिन्यात काही आर्थिक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांपासून पेन्शन, कर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होऊ शकतात. 1 डिसेंबरपासून5 मोठे नियम बदलले जाणार आहेत.
LPG Gas Cylinder Rate : एलपीजी गॅस सिलेंडरचे दर
सरकारच्या मालकीच्या एलपीजी कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या दरातील बदल जाहीर केले जातात. 1 डिसेंबरला व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले जातील. नोव्हेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर बदलले होते. 1 नोव्हेंबरला19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. घरगुती वापराच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आलेले नाहीत.
पेन्शन योजना
सरकारी कर्मचाऱ्यांनायूनिफाईडपेन्शन योजना निवडण्यासाठी 30नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.यापूर्वी अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यालाएनपीएस किंवा यूपीएस पैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यालाएनपीएस किंवा यूपीएस पैकी कोणताही एक पर्याय निवडायचा असल्यास 30 नोव्हेंबरपूर्वी तो निवडावा लागेल. 1 डिसेंबरपासून हा पर्याय निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
लाईफसर्टिफिकेट जमा करावं लागणार
ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी लाईफसर्टिफिकेट जमा करावं लागेल. 30 नोव्हेंबरपर्यंत ती जमा करावी लागणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीनंलाईफसर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्याची पेन्शन थांबू शकते.
करासंदर्भातील बदल
ऑक्टोबरमध्येटीडीएसमध्ये कपात झाली असेल तर तरसेक्शन194-IA,194-IB, 194M आणि 194S नुसारस्टेटमेंट जमा करावं लागेल. ज्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. ज्या करदात्यांनासेक्शन92E नुसाररिपोर्ट जमा करायचा असेल त्यांना तो 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा लागेल.
सीएनजी-पीएनजीचे दर आणि जेटचेफ्यूएल
तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजीसहसीएनजी, पीएनजी आणि एटीएफचे नवे दर जाहीर केले जातात. 1 डिसेंबरला देखील तेल कंपन्या एलपीजीसहसीएनजी, पीएनजी आणि जेटफ्यूएलचे दर बदलू शकतात. एटीएफलाजेटफ्यूलम्हटलं जातं, ज्याचे देशांतर्गत दर आणि आतंरराष्ट्रीय दर वेगवेगळे असतात.
