Richest Families in India : भारतात अशी अनेक कुटुंबांचे व्यवसाय आहेत, की जे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहेत. हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, यावर्षी अंबानी कुटुंब पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यवसायिकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत इतर कोणत्या अनेक कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. जाणून घेऊयात भारतातील सर्वात श्रीमंत 10 श्रीमंत कुटुंबे कोणती याबाबातची माहिती.
अंबानी कुटुंबाने या यादीत पहिले स्थान पटकावले
भारतातील कौटुंबिक व्यवसायांची ताकद सतत वाढत आहे. हुरुन इंडिया रिपोर्ट 2025 हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसने अशा कुटुंबांची यादी जाहीर केली आहे. ज्यांनी त्यांचा व्यवसाय केवळ नवीन उंचीवर नेला नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेष म्हणजे या वर्षी पुन्हा अंबानी कुटुंबाने या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने सलग दुसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 28.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सुमारे एक-बाराव्या भाग आहे. ही कंपनी ऊर्जा, डिजिटल आणि किरकोळ क्षेत्रात मोठी भूमिका बजावत आहे. 1957 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आता दुसऱ्या पिढीकडून चालवला जात आहे.
बिर्ला कुटुंबाचा दुसऱ्या क्रमांक
कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला समूह 6.5 लाख कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सिमेंट आणि धातू उद्योगात त्यांचे मोठे नाव आहे. 1850 च्या दशकात सुरू झालेला हा व्यवसाय आता चौथ्या पिढीकडून पुढे नेला जात आहे.
जिंदाल कुटुंब तिसऱ्या क्रमांकावर
जेएसडब्ल्यू समूहाच्या सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली जिंदाल कुटुंबाने 5.7 लाख कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह तिसरे स्थान मिळवले आहे. धातू आणि खाणकामातील त्यांच्या मजबूत पकडीमुळे ते देशातील अव्वल पोलाद उत्पादकांपैकी एक बनले आहेत.
कोणत्या व्यवसायिक कुटुंबाचा कितवा नंबर?
बजाज कुटुंब श्रीमंत व्यवसायिकांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.6 लाख कोटी रुपये आहे. तर महिंद्रा कुटुंब हे श्रीमंत व्यवसायिकांच्या यादीत पाचनव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 5.4 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. तर नादर कुटुंब या यादीत सहाव्या क्रमाकांवर आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 4.7 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर मुरुगप्पा कुटुंब सातव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 2.9 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर प्रेमजी हे कुटुंब या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 2.8 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. अनिल अग्रवाल यांचा या यादीत नववा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती ही 2.6 लाख कोटी रुपयांवर आहे. तर या यादीत दहावा क्रमांक हा दानी चोकसी वकील यांचा लागतो. त्यांची एकूण संपत्ती ही 2.2 लाख कोटी रुपये आहे.
हुरून अहवालानुसार, भारतातील कौटुंबिक व्यवसायांसाठी सर्वाधिक उत्पन्न देणारे क्षेत्र म्हणजे ऊर्जा, वित्तीय सेवा आणि सॉफ्टवेअर आणि आयटी हे आहे.
महत्वाच्या बातम्या: