एक्स्प्लोर

RBI : आरबीआयचा बँक ऑफ महाराष्ट्रला दणका, 32.50 लाखांचा दंड ठोठावला, CSB बँकेला 63.60 लाखांचा दंड, नेमकं कारण काय?

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील विविध बँकांच्या आणि वित्तीय संस्थांच्या कामकाजाचं नियमन केलं जातं. आरबीआयकडून नियमांचं पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाई केली जाते.

मुंबई : रिझर्व्ह ऑफ इंडिया देशातील सर्व बँका, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्यांच्या कामकाजाचं नियंत्रण करते. बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून बँकिंग नियमन कायद्याचं पालन न झाल्यास आरबीआयकडून आर्थिक स्वरुपात दंडाची कारवाई केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 13 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकांनुसार बँक ऑफ महाराष्ट्र, डीसीबी बॅक लिमिटेड, नावी फिनसर्व्ह लिमिटेड, आयआयएफल फायनान्स  लिमिटेड, सीएसबी बँक लिमिटेड यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई  करण्यात आली आहे. तर, इंडियन मर्चंटाईल को ऑपरेटिव्ह बँक, लखनौचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रला 32.50 लाखांचा दंड

बँक ऑफ महाराष्ट्रला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 6 फेब्रुवारीच्या आदेशानं 32.50 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  बँक ऑफ महाराष्ट्रानं आरबीआयच्या नियमानुसार स्वयंसहायत्ता गटांच्या सदस्यांची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन संस्थांना न दिल्यानं आणि केवायसी संदर्भातील पूर्तता न केल्यानं दंड करण्यात आला आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत दंडाची कारवाई केली आहे. 

डीसीबी बँक लिमिटेडला आरबीआयनं 6 फेब्रुवारीच्या आदेशानं 29.60 लाखांचा दंड केला आहे. अकृषिक सोने तारण कर्ज खात्यांच्या संदर्भात लोन टू वॅल्यू हे सूत्र कायम न राखल्यानं ही कारवाई आरबीआयनं केली आहे. 

नावी फिनसर्व्ह लिमिटेडला आरबीआयनं 3.80 लाख रुपयांचा दंड केला आहे. रिकव्हरी एजंट संदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.  या कंपनीनं ग्राहकांना कर्जाच्या परतफेडीसाठी सायंकाळी 7 नंतर आणि सकाळी 8 वाजण्यापूर्वी संपर्क केला होता.या संदर्भातील प्रोटोकॉल पाळण्यात आले नाहीत, असं आरबीआयनं म्हटलं आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आयआयएफल फायनान्स लिमिटेडला 5.30 लाखांचा दंड केला आहे. आरबीआयच्या असेट क्लासिफेशन संदर्भातील सूचनांची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. 

सीएसबी बँक लिमिडेटला आरबीआयनं  63.60 लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयच्या बिझनेस करस्पाँडन्टची कार्यमर्यादा आणि बँकेच्या ग्राहक सेवा यासंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. बचत खातेदारांना माहिती नसताना बँकेनं शुल्क आकारल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे.  

आरबीआयनं 11 फेब्रुवारीच्या आदेशानं इंडियन मर्चंटाईल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लखनौचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. यासंदर्भातील आदेश आरबीआयच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारीला इंडियन मर्चंटाईल को ऑपरेटिव्ह बँकेचं कामकाज संपल्यानंतर बँक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
बँक ऑफ बडोदात नोकरीची मोठी संधी, 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, काय आहे पात्रता? कसा कुठे कराल अर्ज? 
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report
Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
Embed widget