Continues below advertisement

नवी दिल्ली:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं धनादेश म्हणजेच चेक तीन तासांमध्ये क्लिअरिंग करण्याच्या नियमाच्या अंमलबजावणीलास्थगिती दिली आहे. आरबीआयच्या चेक क्लिअरिंग सुधारणांमधील फेज 2 चा नियम 3 जानेवारी 2026 पासून लागू होणार होता. त्या नियमानुसार बँकेला चेकचाफोटो मिळाल्यानंतर तीन तासांमध्ये चेक मंजूर करायचा होता किंवा नाकारायचा होता. मात्र, आरबीआयनं एक परिपत्रक जारी करत या नियमाच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आरबीआयनं चेक क्लिअरिंगचाफेज 2 फ्रेमवर्क लागू करण्यासाठी स्वतंत्रपणे तारीख जाहीर केली जाईल.

आरबीआयकडून फेज 2 फ्रेमवर्क अंमलबजावणी लांबणीवर

चेक क्लिअरन्स संबंधित फेज 1 चाफ्रेमवर्क पासून लागू झाला आहे. हा फ्रेमवर्क पहिल्यापासून सुरु राहणार आहे. आरबीआयनं चेक प्रोसेसिंगसाठी कामाचे तास बदलण्यात आले आहेत. चेक प्रेझेंटेशनविंडो सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत सुरुराहील. बँक सकाळी 9 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत चेक मंजूर किंवा नामंजूर करु शकतील.

Continues below advertisement

आरबीआयनं चेक क्लिअरन्समध्ये लागणारा वेळ कमी करण्यासाठी चेक टर्नकेशनसिस्टीम म्हणजेच सीटीएसनुसारसीसीएस सुरुवात केली. सीटीएसनुसार चेक क्लिअरिंग डिजीटल इमेज आणि इलेक्ट्रॉनिक डेटाद्वारे जारी केला जातो. याद्वारे चेक प्रत्यक्ष दुसऱ्या बँकेकडे पोहोचवण्याची गरज लागत नाही.

फेज 1 नुसार 4 ऑक्टोबर 2025 पासून चेक क्लिअरिंग सेवा सुरु झाली आहे. आता बँका चेक स्कॅनकरुन त्यानंतर त्याचा फोटो आणि एमआयसीआरडेटाक्लिअरिंग हाऊसला पाठवला जातो. क्लिअरिंग हाऊसला फिक्स्डक्लिअरिंगबॅचेसची वाट पाहावी लागत नाही. यानंतर ड्रॉवी बँकेला चेकचाफोटो पाहून त्याच्या डिटेल चेक केल्यानंतर इलेक्टॉनिकपद्धतीनं चेक मंजूर किंवा नामंजूर करावा लागतो. कन्फर्मेशनविंडोसंपेपर्यंत कोणताही प्रतिसाद बँकेकडून न मिळाल्यास चेक मंजूर किंवा नामंजूर केला जातो.

फेज 2 चाफ्रेमवर्क 3 जानेवारी 2026 पासून सुरु केला जाणार होता. ते लागू झाल्यानंतर चेक क्लिअरन्स कमी वेळात होऊ शकलं असतं. फेज 2 फ्रेमवर्कसुरु झाल्यानंतर तीन तासात चेक मंजूर झाला असता. बँकेला चेक मिळाल्यानंतर तीन तासात चेक मंजूर करावा लागेल. चेक क्लिअरिंगफ्रेमवर्कअंमलबजावणी लागू झाल्यानंतर ग्राहकांना फायदा होणार आहे.