Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आर्थिक वर्ष 2025 (FY25) अखेरीस चार वर्षांतील सर्वात मोठे ओपन मार्केट ऑपरेशन (OMO) आयोजित केले आहे. आज बँकेनं मोठा निर्णय जाहीर केला आहे. बँक 80,000 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करणार आहे. ही खरेदी चार हप्त्यांमध्ये केली जाणार आहे. 3 एप्रिल, 8 एप्रिल, 22 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी प्रत्येक वेळी 20,000 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले जातील. जागतिक आर्थिक मंदी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय बाजारावर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळं आरबीआयचा हा निर्णय बाजाराला स्थिरता देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आरबीआयने मार्चमध्येही एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
आरबीआयने घेतलेला निर्णय म्हणजे बँकेच्या पूर्वीच्या उपक्रमांचा एक भाग आहे. मार्चमध्येही, मध्यवर्ती बँकेने 1 लाख कोटी रुपयांची तरलता (रोख) बाजारात आणली होती, जी दोन टप्प्यांत 50,000-50,000 कोटी रुपये होती. आरबीआयने सांगितले की ते बाजारातील परिस्थिती आणि तरलतेवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक असल्यास पुढील पावले उचलेल. भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये मार्च 2025 अखेरीस 89,400 कोटी रुपये अतिरिक्त होते, तर जानेवारीमध्ये 3.3 लाख कोटी रुपयांची तूट होती. म्हणजेच आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती बरीच सुधारली आहे.
आरबीआयचा हा निर्णय का आवश्यक ?
आर्थिक सुधारणा अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही.
महागाई आणि औद्योगिक विकास मंदावण्याची चिन्हे आहेत.
जागतिक आर्थिक मंदी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे.
आरबीआयचा हा निर्णय बाजाराला स्थिरता देण्याचा प्रयत्न आहे.
देशाची प्रगती आणि लोकांच्या कल्याणासाठी आमचा संकल्प नेहमीच दृढ
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी RBI च्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, पुढील दशक भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वास्तुकलाला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. "90 वर्षांपूर्वी, RBI ची स्थापना भारताच्या आर्थिक आणि आर्थिक स्थैर्याचे संरक्षक म्हणून करण्यात आली होती. या नऊ दशकांमध्ये आम्ही बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. देशाची प्रगती आणि लोकांच्या कल्याणासाठी आमचा संकल्प नेहमीच दृढ राहिला आहे असेही RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
RBI Governor Salary : 450 कोटींची बंगला अन् लाखोंचा पगार, RBI गव्हर्नरची कमाई किती? कोणत्या सुविधा मिळतात?