एक्स्प्लोर

Home Loan : आरबीआयनं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं घटवला, गृहकर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार, किती पैसे वाचणार?

Home Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळं गृहकर्जाच्या व्याज दरात कपात होणार आहे. 

Home Loan मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. यामुळं रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर गृह कर्जाच्या व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे. यामुळं 2008 मध्ये आर्थिक संकटाच्या काळात गृहकर्जाचे व्याज दर ज्या पातळीवर होते त्या टप्प्यावर येऊ शकतात. 

Home Loan : रेपो रेट घटला, गृहकर्ज स्वस्त होणार?

यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओवरसीज बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर 7.35 टक्के आहे. रेपो रेट कमी झाल्यानं व्याज दर 7.1 टक्के होऊ शकतो. यामुळं 15 वर्षांसाठी ज्यांनी 1 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेतलं आहे. त्यांच्या गृहकर्जाच्या व्याज दरात 0.25 टक्क्यांची कपात झाल्यानं ईएमआय 1440 रुपयांनी कमी होईल. एखाद्या कर्जदारानं 15 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचं गृहकर्ज 7.35 टक्के व्याज दरानं घेतलं असल्यास त्याला 45925 रुपयांचा हप्ता भरावा लागतो. 7.1 टक्के व्याज दर झाल्यास त्याला 45221 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजेच ईएमआय 704 रुपयांनी कमी होईल. 

बँकर्सच्या मते नव्या कर्जदारांना गृहकर्ज 7.1 टक्के दरानं कर्ज दिल्यास ठेवींच्या दरात कपात करावी लागेल किंवा बेंचमार्क रेटवरील स्प्रेडमध्ये बदल करावा लागेल, असं झाल्यास नव्या कर्जदारांना सध्याच्या फ्लोटिंग रेट बॉरोअर्सच्या तुलनेत जादा व्याज द्यावं लागेल. 

जोपर्यंत ठेवीचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत बँकांच्या नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये घसरण होणार नाही. दुसरीकडे नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना कमी फंडिंग कॉस्टमुळं तातडीनं फायदा मिळेल. एनबीएफस क्षेत्रातील फायनान्स कंपन्यांना विशेषत: श्रीराम फायनान्स सारख्या कंपन्यांना ही पॉलिसी फायदेशीर ठरेल.  

तज्ज्ञांचं मत काय? 

गोल्डन ग्रोथ फंडचे सीईओ सीईओ अंकूर जालान यांच्या मते ठेवीदारांच्या मते रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात झाल्यानं मुदत ठेव आणि दुसऱ्या व्याजावरील ठेवींवरील कमी होणाऱ्या परताव्यामुळं चिंता निर्माण होईल.  यामुळं येत्या काळात बँकांना ठेवीवरील व्याज दर कमी करावे लागतील. ज्यामुळं ठेवीदारांना चांगला रिटर्न मिळणं कमी होईल. मात्र, कमी व्याज दर मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाढीला आधार देऊ शकतात. मात्र, श्रीमंत गुंतवणूकदार जास्त पराताव मिळवण्यासाठी जास्त परतावा जिथून मिळेल तिकडे गुंतवणूक वळवू शकतात.कमी व्याज दराच्या वातावरणामुळं विकासकांना भांडवलाचा खर्च कमी होईल. 

अग्रशील इन्फ्राटेकच्या सीईओ प्रेक्षा सिंह यांच्या मते भारताचा रिअल इस्टेट उद्योग जागतिक गुंतवणूकदारांना आणि एनआरआय समुहासाठी गुंतवणुकीचं आकर्षणाचं केंद्र बनला आहे. व्याज दरात कपात केल्यानं गुंतवणूक आणखी फायदेशीर ठरेल. स्थिर अर्थव्यवस्था, वाढती मागणी आणि कमी ईएमआय यामुळं भारत गुंतवणुकीचं सर्वोत्तम ठिकाण ठरेल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Elections Results 2026: मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी
Sujay Vikhe-Patil Ahilyanagar Celebration:घोडेबाजार थांबणार,विजयानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Elections Results 2026: मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
Embed widget