RBI Repo Rate मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर रेपो रेट जाहीर केला. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यात युद्धांमुळं निर्माण झालेली अनिश्चितता यासंदर्भात भाष्य केलं.  सध्या निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचं सखोल विश्लेषण  केल्यानंतर  रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवत असल्याचं संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं. आरबीआयनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेट कायम ठेवत गृहकर्जदारांना दिलासा दिला आहे.   

गृहकर्जदारांना दिलासा

आरबीआयकडून रेपो रेट कायम ठेवला जाईल अशी अनेकांना आशा होती. त्यानुसार रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. यामुळं व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही. आरबीआयनं पतधोरण जाहीर करताना सलग तिसऱ्यांदा रेपो रेट कायम ठेवल्यानं गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो रेट कमी न केल्यानं किवा त्यात वाढ न केल्यानं गृहकर्जाचा ईएमआय कायम राहणार आहे.

रेपो रेट जैसे थे का ठेवला?

आरबीआयनं पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी जागतिक पातळीवर भूराजनैतिक संघर्षामुळं निर्माण झालेली अस्थिरता, सप्लाय चेनमध्ये निर्माण झालेले अडथळे आणि दबाव याशिवाय ऊर्जा साधनांचे वाढलेले दर याचा परिणाम विकासाच्या वेगावर झाला असून महागाईच्या अंदाजात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुरवठा तुटवड्याचा परिणाम चौथ्या तिमाहीत आणि त्यानंतर देखील कायम राहील. जागतिक संकटानंतर देखील देशातील रिटेल महागाई दर निश्चित टार्गेटच्या खाली असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.   संजय म्हलोत्रा यांनी म्हटलं की आर्थिक अनिश्चिततांच्या काळात आम्ही आव्हानं पार करुन पुढं जाऊ असा विश्वास आहे.  पतधोरण विषयक समिती डेटावर लक्ष ठेवेल, आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा म्हणाले की पुरवठ्यावरील दबाव आणि इतर घडामोडींवर आमचं लक्ष असेल. सलग  तिसऱ्या तिमाहीत न्यूट्रल धोरण स्वीकारत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हलोत्रा यांच्याकडून सांगण्यात आलं. 

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट जैसे थेट ठेवल्यानं आता येत्या काळात ज्यांना गृहकर्ज घेऊन घर खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवल्यानं बँकांकडून गृहकर्जाचे व्याज दर वाढवले जाणार नाहीत. यामुळं घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.