Gold Price : भारतीयांना सोन्याच्या (Gold) दागिन्यांची जितकी आवड आहे तितकी जगातील इतर कोणत्याही देशात पाहायला मिळत नाही. भारतीय महिलांचा विशेषत: सोन्याचे दागिने घेण्याकडे कल जास्त असतो. मात्र, देशातील सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीचा परिणाम या ट्रेंडवर दिसून येत आहे. सोन्याच्या वेगाने वाढणाऱ्या किमती हे या नवीन ट्रेंडमागचे कारण मानले जात आहे.
जुने सोन्याचे दागिने वितळवून नवीन सोन्याचे तयार करण्याच्या कामात मोठी वाढ होताना दिसत आहे. कारण देशात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर नवीन सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडे फारच कमी पर्याय उरले आहेत. जड सोन्याच्या दागिन्यांसाठी जुन्या दागिन्यांची देवाणघेवाण करण्याचा ट्रेंड वाढला आहे. जड सोन्याच्या दागिन्यांवर मोठा खर्च टाळण्याचा मार्ग दागिने खरेदीदारांनी शोधला असून त्याचा परिणाम देशाच्या सराफा बाजारावरही दिसून येत आहे. घरांमध्ये ठेवलेले जुने सोन्याचे दागिने वितळवून त्यांच्या उच्च किंमतीच्या आधारे नवीन दागिने बनवण्याचा आणि खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. याशिवाय, हलके आधुनिक सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहेत जे महिला सामान्यतः दररोज परिधान करतात आणि कार्यालयात घालू शकतात
जुन्या दागिन्यापासून नवीन दागिने तयार करण्याचा कल
जुन्या दागिन्यापासून नवीन दागिने या ट्रेंडबद्दल, ज्वेलर्स म्हणाले की, जुन्या दागिन्यांमधून नवीन दागिने बनवणारे ग्राहक मोठ्या संख्येने आहेत. देशभरातील सराफा बाजारात हा कल दिसून येत असून सोन्याच्या वाढत्या किंमती हे त्यामागचे कारण असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लग्नसराईच्या काळात लोकांना खरेदी करावी लागते आणि अशा पद्धतीने सोन्याची अधिक खरेदी केली जात आहे.
अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: